पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



निरनिराळे गंभीर व सामान्य विकारांत याचा कसा उपयोग होतो हे आपण पाहू. कल्पनाचित्रे (Visualization and Imagery), मानसपूजा, जप, प्रार्थना ह्यांचा ह्या कामी कसा उपयोग होतो याचे अनेक नमुने आपण पाहिले. याची वैद्यकशास्त्राला नुसती जोड नव्हे तर ते वैद्यकशास्त्राचे अतूट अंग व्हावयास पाहिजे. निरामय जीवनासाठी एक शिडीची जर कल्पना केली तर ती अशी होईल - सर्वप्रथम श्रद्धा, नंतर आहार, योगाभास व शेवटी जरुरीपुरते वैद्यकीय उपचार. आज जे दिसते ते बरोबर उलट. प्रथमस्थानी वैद्यकशास्त्र, मग आहार व व्यायाम. यात श्रद्धा व उन्नत मन यांना कोठेही स्थान नाही, हीच खेदाची गोष्टआहे.

 वर चर्चिलेल्या पद्धतीची थोडी जास्त चर्चा आपण पुढे करू.

२४९