पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दैनंदिन योगसाधना


बृहदारण्यक उपनिषदात पुढील प्रार्थना आढळते.-
 "असतो मा सद्गमय ।
 तमसो मा ज्योतिर्गमय ।
 मृत्योर्मा अमृतं गमय ॥"


असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे जाऊ या. मानवाच्या अंतर्मनात चांगल्या व वाईट भावनांचा मिलाफ असतो. यासाठीच जणू वाइटाकडून चांगल्याकडे जाण्याच्या तीव्र इच्छेपोटी अशा प्रार्थना केल्या जात. अमरत्वाची इच्छा मानवास ऋग्वेदकालापासून होती. मी मर्त्य आहे तर, मी अमर कसा होईन ही उत्कंठाच जणू त्या वैदिक ऋषींना होती. प्रस्तुत वाक्यत्रयीत अमृतत्वाच्या ओढीपोटी मन अशा प्रार्थना करते. मरणापासून मुक्त होण्याची व अमृतप्राप्तीची इच्छा 'तमसो मा ज्योतिर्गमय' या दुसन्या ओळीत स्पष्ट आढळते. परमतत्त्व हे प्रकाशमय आहे. त्याला उपनिषदांनी प्रकाश असे म्हटले आहे. आधुनिक काळात आपण त्याचा अर्थ अज्ञानरूपी अंधारातून आम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाऊ दे असा घेऊ या. असत्याच्या अंधारातून सत्याच्या प्रकाशाकडे जाऊ दे. मरणाची भीती हा अंधकार, त्यापासून अमरत्वाकडे, अमृतत्वाकडे जाऊ दे असा काढणे योग्यच ठरेल. या तीव्र इच्छेचे रूपांतरच प्रार्थनेमध्ये होत असते. यासाठी

२५०