पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करावयाचा अभ्यास, त्याचे कष्ट म्हणजेच तपश्चर्या, यालाच उपासनाही म्हणता येईल. अनेक अमेरिकन विचारवंतांना भारतीय संस्कृती, कौटुंबिक जीवन व तत्त्वज्ञान याविषयी अत्यंत ओढ असते. कारण अमेरिकन आज आत्यंतिक भोगवादाच्या दलदलीत रुतलेले आहेत. स्टीफन ह्यूलर अशांपैकीच एक. उत्तम लेखक, उत्कृष्ट फोटोग्राफर. एक व्यावसायिक श्रीमंत. असा हा माणूस भारतातील गरिबी, घाण या गोष्टी वरवरच्या मानून मनोमन भारताच्या आत्म्याशी एकरूप होतो, आणि आपण मात्र हे विसरत चाललो आहोत. सावतामाळी यांचा “ऊस जरी डोंगा, रस नव्हे डोंगा, का रे भुललासी वरलिया रंगा" ही किंवा "मन है चंगा तो कथवटमें गंगा" ह्या उक्त्या शुद्ध मनाचे महत्त्व सांगतात. स्टीफन ह्यूलर यांना हे कळले होते, त्यांनी ते आचरणात आणले आहे.

 हे मिळविण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधना तपश्चर्या. आपल्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. सर्वच साधुसंत, एकलव्यासारखे धनुर्धारी किंवा नचिकेतासारखे ज्ञानपिपासू ही काही उदाहरणे. यालाच आपल्या आध्यात्मिक भाषेत योगसाधना म्हटलेले आहे. आत्मा व परमात्मा यांचे मीलनाला योग ही संज्ञा लागू पडेल. असे योगाचे अनंत पैलू आहेत. गीतेचा प्रत्येक अध्याय म्हणजे योगाचा एक एक पैलू आहे. त्यात अत्यंत कठीण साधनेपासून ते सामान्य माणसांसाठी भक्तियोग येथपर्यंत अनेक मार्ग सांगितले आहेत. जीवनाच्या प्रत्येक उपयुक्त कोनावर भाष्य आहे, सूचना आहेत. गीतेचा सहावा अध्याय म्हणजे ध्यानयोग. याचा पुढे आढावा घेऊच. पण त्यातील सोळा व सतरा हे श्लोक आहार विहारावर युक्त काय व अयुक्त काय हे सांगतात -

 " नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।  
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।।
"

हे अर्जुना जो (अधाशी) अतिशय खाणारा किंवा जो रोजच लंघन करतो, जो अतिझोपणारा आहे अथवा जो रोजच जाग्रणे करतो ( पुरती झोप घेत नाही) तो योगी होऊ शकत नाही.
 या श्लोकात योगसाधनेसाठी भोजन व निद्रा यावर जे भाष्य आहे, तो किती महत्त्वाचे आहे व जे आज विज्ञानाधिष्ठित आहे असे आपण म्हणू शकतो, त्याने

२५१