पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निदान आरोग्य उत्तम राहते.

यु"क्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
,
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखहा ।। (६-१७ ) "

 जो मनुष्य खाण्याच्या, झोपण्याच्या, कर्म करण्याच्या क्रीडा, करमणूक करण्याच्या आपल्या सवयीत नियमित असतो, त्याची सांसारिक दुःखे योगाभ्यासे नष्ट होऊ शकतात.
 येथे श्रीकृष्ण सांगतो की मानवाला खाणे, निद्रा, स्वसंरक्षण, वैवाहिक सुख अशा गोष्टी जरूर आहेत, पण त्यांत संयम व नियमितपणा पाहिजे. या पार्श्वभूमीवर आजचे जीवन पाहा. यात आहार-विहार, निद्रा यांत संयम सोडाच पण नियमितपणाही अपवादानेच. आज जेवण अकरा वाजता तर उद्या दोन वाजता. रोज चमचमीत खाण्यासाठी नवीन नवीन हॉटेल्सना आसरा. विद्यार्थी रात्री जागरण करून टी.व्ही. पाहतात किंवा परीक्षा आल्यावर रात्र रात्र जागरण करून अभ्यास करतात. त्यामुळे निद्रा अवेळी व अपुरी होते. याचा परिणाम, पचनसंस्था, मलनिस्सारणसंस्था अशा देहाच्या अनेक संस्थांवर दुष्परिणाम घडतातच, परंतु मनावरही दुष्परिणाम होत असतात. स्मृतीही जागरणाने कमी होते. बुद्धयंकावरही परिणाम होतो. लवकर निजून पहाटे उठले तर आदल्या दिवसाच्या श्रमांचे, विश्रांतीमुळे हरण तर होतेच, परंतु स्वच्छ हवा, शांत वातावरण व उल्हसित यामुळे कोणतीही साधना उत्तम होते. स्मृती सुधारतच गेल्यामुळे कमी वेळात जास्त अभ्यास होऊ शकतो. या निरूपणाची व्याप्ती खूप वाढवता येईल. परंतु अनेक पानांत ज्यांचा विस्तार मांडावा लागेल, ती तत्त्वे फक्त दोन ओळीत सांगितलेली आहेत. हे सौंदर्य गीतेत सर्वत्र आढळते. गीता म्हणजे सर्व उपनिषदांचे किंबहुना एकूण अध्यात्माचे सार आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
 योगसाधना हे देह व मन यांच्या शांतीचे एक साधन आहे. परंतु याच्या अनंत पैलूंपैकी आरोग्याशी निगडीत एवढे पैलू आपण पाहू. आजच्या युगाचा शाप म्हणजे अतिरिक्त ताणतणाव व त्यामुळे होणारी अपरिमित आरोग्याची हानी. यामुळे का होईना सर्व विश्वातील मानव इकडे वळू लागले आहेत. भारतीय तत्त्वज्ञान व योगसाधना ही आज नमुनेदार समजली जाते. आधुनिक आरोग्यवैज्ञानिकांनी अनेक

२५२