पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुंबई- पुण्यात अनेक हास्य क्लब निघाले आहेत. ह्यांत पारंपरिक व शास्त्रीय अशा दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत. याचा उगम बौद्ध संप्रदायात सापडतो. पण येथेही आसने व प्राणायाम व शेवटी शवासन या पूर्वतयारीची जरुरी आहे असे मला वाटते. कारण अन्नमय कोश म्हणजे देह, प्राणमय कोश हे नैसर्गिकपणे शुद्ध झाल्यावरच धारणेचा उपयोग होईल. स्नान करून देहशुद्धी व मंत्रपठणाने मनः शुद्धी झाल्यावरच देवपूजा संपन्न होते, तसेच हे आहे. व्यास व वाचस्पती यांनी तर नाभिचक्र, हृदयचक्र, आज्ञाचक्र, जिव्हाग्र यांचाही धारणेसाठी उल्लेख केला आहे. तो विषय मात्र आंतरिक आहे. ध्यान : विभूतिपाद या तृतीय पादामध्ये पहिल्याच सूत्रात पतंजली ध्यानाचा उल्लेख करतात.

“देशबंधश्चितस्य धारणा ॥। ३-०१ ॥ "

हे सूत्र द्वितीय पादातील धारणेसंबंधी आहे. देश ( आकृतिबंध) यात चित्त . सर्वसमावेशकतेने एकाग्र करणे म्हणजे धारणा. ही जणू धारणेची उजळणी आहे. आणि शेवटी ध्यान म्हणजे काय ?

"तत्र प्रत्यैकतानता ध्यानम् ॥३-०२॥"

पतंजली म्हणतात की तिथे, अनुभव, एकतानतेने समरसता म्हणजे ध्यान. ध्यानाला धारणेची कशी महत्त्वाची बैठक आहे, हेच या सूत्रात सांगितले आहे. असे एखाद्या विषयाशी तद्रूप होणे, आपली संपूर्ण जाणीव त्यावर केंद्रित करणे म्हणजे ध्यान. असे हे ध्यान नियमित होऊ लागले की त्यातूनच अंतर्मनाच्या सुप्त शक्ती जागृत होत असतात. डॉ. कोल्हटकरांनी ह्यातून ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याविषयी पुढील सूत्रावर विवरण केले आहे. " ततोऽणिमादिप्रादुर्भावः कायसंपत्तद्धर्मानाभिघातश्च ।। ३-४५॥”
 सर्व स्थूल सूक्ष्म भूते आणि त्यांचे स्वभावधर्म योग्याच्या इच्छेशी अनुकूलत्वाने तू लागल्यामुळे त्याच्या ठिकाणी (१) अणिमा ( २ ) महिमा ( ३ ) गरिमा

२६१