पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 “धृतिः क्षमा, दमोऽस्तेयं शौचमिंद्रियनिग्रहः ।
 धीर्विद्या सत्यमक्रोधो दशक धर्मलक्षणम् ॥”
 संतोष किंवा समाधान (धृतिः), नियंत्रण, सहिष्णुता (दम:), चोरी न करणे (अस्तेय), शास्त्रांचे तत्त्वज्ञान (धी:), यथार्थ अभिज्ञान (विद्या), सत्य (सत्यम्), न रागावणे, संताप होऊ न देणे - शांति (अक्रोध:) हे दशक म्हणजेच धर्मलक्षण. तेव्हा संप्रदाय म्हणजे धर्म नव्हे. एका संघटित संप्रदायाचे लोक दुसऱ्या संप्रदायाच्या लोकांचा द्वेष करतात, त्यांना ठार मारण्यासही कमी करत नाहीत व आपल्याच संप्रदायात इतरांना ओढण्याचा प्रयत्न करतात, त्याला धर्मयुद्ध म्हणतात, तो संप्रदाय धर्म होऊच शकत नाही. तीच तन्हा धर्माच्या कर्मकांडाची. धर्म हा तेव्हाच धर्म असतो जेव्हा तो एकी करतो सर्व समाजाला

एकत्र बांधतो. दया, क्षमा, शांती हे सद्गुण मनावर बिंबवतो तेव्हाच त्याला धर्म असे संबोधिता येईल. धर्मपरिवर्तन म्हणजे बाटवाबाटवी नव्हे. ही फक्त संप्रदायाची संख्या वाढवणे आहे. धर्मपरिवर्तन म्हणजे दुःख, दैन्य यांतून सुख, संपन्नता य नेणारा रस्ता. असा हा चांगल्याकडे जाण्याचा व वाईटाचा त्याग करण्याचा मार्ग. धर्माचे बाह्यांग म्हणजे व्रतवैकल्ये, अंधश्रद्धा, पुराणकथा, दंतकथा, कर्मकांड इत्यादी. सर्व संप्रदायांतील बहुतांश लोकांचे इकडेच लक्ष जास्त असते आणि धार्मिक पुढारी अंतरंगाला विसरून बाह्यांगाचा उदो उदो करतात. धर्माचा आंतरिक गाभा किंवा आत्मा म्हणजे नीतिमत्ता, दया, अहिंसा, प्रेम, बंधुत्व, करुणा, औदार्य, ह्यासारखे सात्त्विक गुण हा होय. यापासून विचलित होऊन दुसऱ्याचा धर्म तो सैतानाचा व आपला तो परमेश्वराचा, असे मानून दुसन्या धर्मातील लोकांना सैतानाच्या तावडीतून सोडवून आपल्या धर्मात आणण्यासाठी कोठल्याही मार्गाचा भले तो हिंसा, अत्याचार अशा कोठल्याही मार्गाचा अवलंब करणे म्हणजे ईश्वराचे घरी गंभीर गुन्हा आहे. काही वेळा तर हे असे अतिरेकी विचार त्या धार्मिक पुढाऱ्यांना न आवडणा-या टीकेला बौद्धिक उत्तर नसल्यामुळे, त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यापर्यंत या धर्मलंडांची मजल जाते. बौद्ध धर्माने आपणास, अहिंसा, करुणा, प्रेम ह्या गोष्टी शिकवल्या आहेत, आणि त्या भारतीय परंपरा व तत्त्वज्ञान यांचाच भाग आहे. विपश्यनेतून आपण मनःशांती मिळवू शकतो, मनाचे उन्नयन करून अंतर्मनाच्या शक्ती वाढवू शकतो. गुन्हेगार, क्रूर समजले जाणारे लोक, पापी,

२६६