पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषयांध अशा लोकांचीही मने बदलण्याचे कार्य विपश्यनेने केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती किरण बेदी ह्या श्रेष्ठ पोलिस अधिकाऱ्याने तिहार तुरुंगातील नरकामध्ये सुधारणा घडवून आणली, तेथील गुन्हेगारांची मानसिकता बदलली. 'आय् डेअर' (1 dare) ह्या त्यांच्या पुस्तकात याचे सविस्तर वर्णन आलेले आहे.
रेकी :
 रेकी ही शरीर, मन व आत्मा यांची शुद्धी व उन्नती साधण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे निरामय, यशस्वी जीवनशैलीचा लाभ होतो, असा विश्वास या पद्धतीच्या अनुयायांमध्ये आहे. ह्यात शंका घेण्याजोगे काहीच नाही. अनेक गोष्टी आपणा सामान्य माणसांच्या सहज अनुभवास येत नाहीत, पण त्यामुळे ती गोष्ट खोटी आहे असे म्हणणे म्हणजे एकांगी विचारसरणी झाली. “ती गोष्ट सत्य असेलही पण आपल्या अनुभवास चटकन येत नाही" एवढाच शेरा किंवा आपले मत मांडणे युक्त होईल. रेकीला तिच्या जनकाने 'ऊर्जास्रोत' असे नाव दिलेले आहे. पातंजल योगसूत्रांत 'सिद्धी' हा शब्द वापरला आहे ती आणि रेकी ही मूलतः एकच. रेकी हा शब्द भारतीय नाही. तिचा जनक जपानी आहे. रेकीचा उगम कसा झाला हो एक कहाणीच आहे. 'रे' याचा अर्थ वैश्विक शक्ती. मागे आपण पाहिले की मन हे देहापुरतेच स्थानिक नसून ते ब्रह्मांड व्यापून राहिलेले आहे. त्याची शक्ती हीच वैश्विक शक्ती व हाच अर्थ 'रेकी' या शब्दात अध्याहृत आहे असा माझा विश्वास आहे.

 रेकीचे जनक मिकाओ उसुई हे ख्रिश्चन धर्मगुरू, पारमार्थिक अध्ययन अध्यापन व ख्रिस्ती धर्मावर प्रवचन हाच त्यांचा कार्यक्रम ओघानेच असणार. त्यांना एका शिष्याने विचारले की प्रभू येशू हस्तस्पर्शाने लोकांना रोगमुक्त करत असे हे कसे ? तो प्रभूचा पुत्र, पण मानव. मग इतर मानवांना ही विद्या, ही शक्ती का मिळू नये? ती मिळवण्याचे मार्ग काय? हा प्रश्न म्हणजे गहन, डॉ. उसुईंनाही ह्याचे उत्तर देता येईना. प्रभू येशू हे सहज करत असे ही गोष्ट लिखित स्वरूपात आढळत असे, पण ते कसे? डॉ. उसुईंना आपल्या अज्ञानाची खंत वाटली व त्याचा शोध घेण्याचे त्यांनी ठरवले. हे कार्य काही सोपे नव्हते. त्यांनी अमेरिकेत शिकागो विद्यापीठात दाखल होऊन थिऑलॉजी ह्या विषयात डॉक्टरेट मिळवली. ख्रिस्ती धर्माचे जे जे

२६७