पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हते. सतत ओढ योगाची. शेवटी पळून जाऊन त्यांनी योगसाधना करून स्पर्शाने लोकांना व्याधिमुक्त करण्याची सिद्धी मिळवली. परंतु त्यांचे व्यावहारिक जीवन हालाचेच होते. कारण कोणाहीकडून काहीही घ्यावयाचे नाही हा नियम. शेवटी त्यांच्या भक्तांनी अशिक्षित असूनही त्यांना रेल्वेत नोकरी मिळवून दिली. शिक्षणाचे सर्टिफिकेट नसले तरी हे मूलतः हुशार व ज्ञानी. त्यामुळे ते नोकरी व आपली समाजसेवा उत्तम प्रकारे पार पाडत होते. त्यांची कीर्ती दूरवर पसरली. ही कीती त्या काळचे सी.पी. व बेरारचे ब्रिटिश गव्हर्नर यांचे कानावर गेली. त्यांची पत्नी तीव्र संधिवाताने आजारी होती. तिला उपयोग होईल ही भोवतालच्या लोकांनी खात्री दिल्याने श्री. सिंग यांना बोलावण्यात आले. त्या स्त्रीला उभे राहणेही अशक्य होते. श्री. सिंग यांनी तिच्या मानेभोवती हात ठेवून ध्यान केले. आणि अहो आश्चर्यम्!’ ती स्त्री चक्क उभी राहून चालू लागली. ही कहाणी पाच सिद्धपुरुष अशा नावाच्या पुस्तकात एका मराठी लेखकाने लिहिली आहे. दुर्दैवाने आज मला त्यांचे नाव आठवत नाही व शोधूनही ते पुस्तक मिळाले नाही. पण एखादा तरी वाचक हे सांगू शकेल. आजवर अशा अनेक कहाण्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण यापैकी आपल्या स्वार्थासाठी एकानेही ही विद्या वापरली नाही. या लोकांना मी संत व आदर्श मानतो. आजही आपले विविध क्षेत्रांतील ज्ञान गोरगरीब व मागासल्या लोकांसाठी उपयोग करणारी त्यागी माणसे आहेत. सिद्धी प्राप्त झालेली नसतानाही स्पर्शाने रुग्णांना दिलासा देणाऱ्या व अंती त्यांना व्याधीतून मुक्ततेसाठी मदत केलेल्या कहाण्या पुढे आपण पाहू. ह्या स्पर्शाला शक्ती करुणा, माया, प्रेम या उच्च भावनांमधून मिळत असते. ह्या उच्च भावनांत जेव्हा स्वार्थ उद्भवतो. तेव्हा शक्ती नष्ट होतात. निरपेक्ष, निरिच्छ माया ही कल्पनातीत यश देते.
जपजाप्य आणि मानसपूजा :

 जप हीसुद्धा ध्यानधारणा आहे. येथे आपण ज्या देवाचे नावाचा किंवा एखाद्या मंत्राचा जप करत असतो तीच धारणा आणि त्यावर मन पूर्ण केंद्रित करणे हे ते ध्यान. यात जपसंख्या ही माझे दृष्टीने एक गौण बाब आहे. यापेक्षा इतर कोठलाही विचार मनात न येता - निर्विकार मनाने किती वेळ जप करता, हा काळ जास्त महत्त्वाचा आहे. आपण एक हजार एक वेळ जप केला व तो करताना मन जर

२६९