पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आधुनिक कालखंड म्हणजे प्रगतीचा चढता आलेख अशी आप-आपली एक भाबडी कल्पना आहे. औद्योगीकरणामुळे अनेक नवनवीन सुखसोयी निर्माण झाल्या प्रवासापासून ते वैद्यकशास्त्रापर्यंत अनेक सुधारणा व सुखसोयी निर्माण झाल्या. त्यांची लांबी मारुतीच्या शेपटासारखी होईल. ह्या सर्व सुखसोयींसाठी किंमत ही मोजावी लागतेच. पण ही किंमत जर मानवाचे आयुष्यच उद्ध्वस्त करणार असेल तर 'भीक नको पण कुत्रा आवर' असे म्हणण्याची वेळ येते. हवेचे अफाट प्रदूषण वाढले, रासायनिक कारखाने, शहरांची वाढती लोकसंख्या व त्यामुळे सांडपाण्यात अफाट वाढ यामुळे नद्या प्रदूषित झाल्या, पंपांनी सतत काढण्यामुळे जमिनीखालील पाण्याचे साठे संपत आले. जंगले नष्ट झाली, कित्येक प्राणी कायमचे नष्ट झाले, महासागरातील जीव नष्ट होण्याच्या मार्गाला लागले आहेत. एक ना दोन या सर्वांची एक लांब यादी तयार होईल. अनेक विचारवंत याविरुद्ध आवाज उठवत आहेत पण राजकीय व सामाजिक अनास्था व दुर्लक्ष यामुळे सुधारणा होणे दूरच राहिले, हल्लीची विकारातील वृद्धी ही त्याची किंमत आहे. किंबहुना मानवाचे अस्तित्वच धोक्यात येत आहे. हल्ली औद्योगिक धंद्यामध्ये रोज वाढ होत आहे. यात उपयुक्त वस्तूंच्या उत्पादनापेक्षा चैनीच्या वस्तूंचेच उत्पादन वाढते आहे. आणि ह्या उद्योगधंद्यात काम करणाऱ्या व्यक्तींचे आरोग्यच धोक्यात येत आहे. हृदयरोग, मधुमेह, कर्करोग अशा रोगांत अतोनात वाढ झाली आहे. शहरांत दम्यासारखे श्वसनसंस्थेचे रोग वाढत आहेत. "इ.स. २००० साली सर्वांना आरोग्य" ही घोषणा पूर्ण खोटी ठरली आहे व आरोग्य या शब्दाऐवजी अनारोग्य हा शब्द घातला तरच ते सत्य होईल. उद्योगधंद्यांतील असह्य ताणतणावामुळे त्यांतील व्यक्तींना ऐन तारुण्यात सुद्धा हृद्रोग होऊ लागले आहेत. ताणतणाव मानवाच्या आदिम कालखंडापासून होते पण त्याला तोंड देण्याची शक्ती मानवाजवळ भरपूर होती. आता हे ता असह्य अवस्थेप्रत गेल्यामुळे त्यांचे दुष्परिणाम सर्वांच्या आरोग्यावर होत आहेत. याचमुळे ताणतणावांचे व्यवस्थापन (Stress Management) हा नवीन विषय निर्माण झाला आहे. याचा थोडासा आढावा आपल्या विषयासाठी आपण घेऊया.
ताणतणावांचे व्यवस्थापन - आधुनिक विचार :

 ताणतणाव निर्माणच का होतात? त्यावर आधुनिक उपाय काय? व अध्यात्माचा यासाठी किती उपयोग होऊ शकतो? ह्या गोष्टींचा आढावा आपण घेऊ. ताण-

२७२