पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्योगधंद्यातील ताणतणाव तीव्र स्पर्धेमुळे वाढत चालले आहेत. ह्या ताणांमुळे हृदयरोग, मधुमेह यांचेही रोगी वाढत आहेत. अकाली मृत्यू ही अपवादात्मक गोष्ट राहिली नसून तिचे अनेक आविष्कार पाहावयास मिळतात. यातून पलायनवाद (Fight or Flight Mechanism) निर्माण होत असतो. याची लक्षणे म्हणून खालील गोष्टी सांगता येतील.

  • नाडीची गती वाढणे (Increase in H.B.R.).
  • रक्तदाबामध्ये वाढ.
  • श्वासोच्छ्वासाचा वेग वाढणे.
  • रक्तशर्करेमध्ये खूप वृद्धी.
  • विस्तारित नेत्रबाहुल्या.
  • पचन कमी होणे, भूक कमी लागणे, वजनात घट.
  • रक्तातील गुठळ्या वाढण्याच्या प्रक्रियेत वाढ व हृदयरोगाचे गुपचुप आगमन. हे ताणांचे प्रकार व स्थानेही एकापेक्षा जास्त असतात. ते मुख्यतः असे

असतात -

  • उद्योगातील जबाबदाऱ्यांमुळे येणारे ताण.
  • वैयक्तिक जीवनात येणारे ताण.

ही माहिती थोडक्यात सांगितली असली तरी त्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात करावा लागेल. त्याची आपणास जरुरी नाही. पण उद्योगधंद्यातील स्पर्धांमुळे शेवटी सेवकवर्ग मानसिक दृष्ट्या थकून जातो. पुष्कळ वेळा आपल्याला हवे असणारे, आवडणारे काम कमीच असल्यामुळे, नको ते काम वाटणीस येते व सेवक कंटाळून जातो व नाइलाज म्हणून ते कार्य करत असतो. निर्मितीच्या कार्यात नुसता दर्जाच नव्हे तर किती काळात हे काम संपले पाहिजे याच्या सीमा ठरविलेल्या असतात. याचा फार ताण येत असतो. कार्याची आखणी व त्यात निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी या फारच अडचणीच्या ठरतात. स्पर्धा जेवढी जास्त तेवढी प्रत्येक

२८०