पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना माहीतच नसतात. म्हणजे वृत्तीने आपले तुकाराम महाराज. आपलेकडील सिद्धपुरुष (खरे) साधू, संन्यासी हे भारतीय शमानच होत.
विज्ञानस्तरावर या हकीकती :
 मानवाला प्राण्यांच्या बरोबर मनाची एकरूपता करता येते का? त्यांच्याशी संवाद साधना येतो का? आजच्या युगात प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक आधार नसेल तर त्यांना भाकडकथा असे म्हटले जाते. अत्यंत प्राचीन काली आजच्या सारखी वैज्ञानिक प्रगती झालेली नव्हती, यामुळे सामान्य माणूस स्वतःच्या अनुभवाने किंवा आदरणीय, सत्यवचनी व्यक्तींवर विश्वास ठेवून या गोष्टी सहज मान्य करत. त्या काळीही ढोंगी वा स्वार्थी नव्हते असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. परंतु त्या वेळी धार्मिक, सामाजिक अशी बंधने बहुसंख्य लोक पाळत असत. नाहीतर समाज त्याला वाळीत टाकत असे. वैज्ञानिक प्रगतीबरोबर जशा वाईट प्रथा नष्ट होऊ लागल्या, तशा चांगल्या प्रथा, चांगल्या धारणाही नष्ट होऊ लागल्या. विज्ञान हे एक शस्त्र आहे. ते आपण कसे वापरतो हे महत्त्वाचे. मनुष्य दुष्ट असतो, विज्ञान नाही. तेव्हा आजच्या युगात विज्ञानाची कास धरणे हाच महत्त्वाचा धर्म आहे. त्याचा वापर वाईटपणे करणे हा मानवाचा आत्मघातकीपणा. अंतर्मनाच्या शक्तीवरील नाहीसा झालेला विश्वास हा असाच एक तोटा.
 आजच्या युगात मानव आणि प्राणी यांच्यात संवाद घडू शकतो, त्यांच्या मनाची एकरूपता होऊ शकते, हे लोक समजू शकत नाहीत. आपण पाळीव प्राण्यांचेच उदाहरण घेऊ. काही श्वान, मांजरे, पोपट हे आपल्या मालकांशी एका अर्थी एकरूप झालेले असतात. काही कुत्रे मालकाने खायला दिल्याशिवाय कितीही उत्कृष्ट, आकर्षक अन्न द्या त्याला तोंड लावणार नाहीत. मालक त्यांना दुसऱ्यावर सोपवून परगावी गेला तर उपाशी तर राहतात व झुरून झुरून आजारी पडतात. काही वेळा तर मालकाचा मृत्यू झाला तर तेही मृत्युमुखी पडतात. कित्येक वर्षांपूर्वी वाचलेली एक कथा आजही मला आठवते आहे. त्या कथेचे नाव होते 'अप्पांची बैलांची जोडी'. कथा काल्पनिक आहे पण त्यातील गूढार्थ सत्य आहे. तो म्हणजे मानव व प्राण्यांची मनाची एकरूपता, एकमेकांत संवाद साधण्याची शक्ती. ह्या अप्पांनी वासरे असल्यापासून पाळलेली खोंडांची एक जोडी होती. अप्पांनी स्वतः २८