पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्याबाबत काळजी घ्यावी लागते. त्यातील 'अ' काविळीचा प्रकार (Hepatitis 'A') हा थोडीशी काळजी, हलका आहार व भरपूर ग्लूकोज यामुळे सहज बरा होतो. परंतु 'ब' प्रकारची कावीळ ही सहज बरी होणारी गोष्ट नाही. ती सुप्तावस्थेत जाते व परत परत उद्भवू शकते. या रुग्णांचे रक्त, किंवा किडनी दुसऱ्याला देता येत नाही. परंतु श्रद्धा, विशिष्ट आहार व औषधोपचार यामुळे ती सत्वर काबूत येऊ शकते. पचनसंस्थेचे नेहमीचे विकार खालीलप्रमाणे आहेत -
(१) अग्निमांद्य (Loss of appetite) व खोटी भूक (Bulimia Naroosa)
(२) आम्लपित्त (Acidity)
(३) जठर व लहान आतड्यांचे व्रण (Gastric / Duodonal Ulcer)
(४) वांती (Nausea & Vomiting)
(५) पोटशूल (Rolic)
(६) कावीळ (Jaundice / Hepatitis A & B)
(७) जंत (Worms)
(८) आंत्रदाह (Colitis)
(९) सिन्हांसिस (Cirrhosis of Liver)
(१०) पित्तखडे (Stones/Calculi)
(११) ढेकरा (Eructations )
(१२) उचकी (Hiccough)
(१३) अंतर्गळ (Hernia)
(१४) वृद्धांच्या समस्या (Geriatric Problems)
(१५) अन्ननलिकेचा पक्षाघात (Paralysis of Oesophagus)

या विकारांत, काही गंभीर तर काही सामान्य आहेत. पण हे सर्व मनःशांती

२९०