पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमी-जास्त प्रमाणात नष्ट करण्यास कारणीभूत होत असतात. मनःशांतीसाठी ओघानेच ध्यानधारणा हा उत्तम उपाय. ह्या सर्वांची प्रदीर्घ चर्चा माझ्या 'मागोवा आरोग्याचा' या पुस्तकात केली आहे. (याच्या दोन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दुसरी आवृत्ती सुधारित आणि विस्तारित आहे. ) ही माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे. यांतील वृद्धांच्या समस्यांचा थोड्या खोलवर जाऊन पुढे विचार केला आहे. 'आहार' हा विषय वैद्यकाइतकाच महत्त्वाचा आहे. त्याचा परामर्श थोडक्यात पुढे वेगळ्या प्रकरणात केला आहे. त्यातच या समस्यांचा विचार आहे.
मलविसर्जनाच्या तक्रारी :
 या भागात मुख्यतः खालील विकार येतात. पचनसंस्थेची जी आकृती दिली आहे त्यातच ही संस्थाही अंतर्भूत आहे.
 (१) बद्धकोष्ठ (Constipation)
 (२) आंत्रपुच्छ दाह (Appendicitis)
 (३) अतिसार (Diarrhoea)
 (४) आमांश (Dysentry)
 (५) भगंदर (Fistula in Anus)
 (६) गुदव्रण (Annal Fissure)
 (७) मुळव्याध (Piles- Haemorrhoids)

 हे सर्व विकारही पचनसंस्थेप्रमाणे काही गंभीर तर काही सामान्य आहेत. यांची चर्चाही 'मागोवा आरोग्याचा' यात करण्यात आली आहे. यातही प्रत्येक विकारात ध्यानधारणा उपयोगी पडते. ध्यानधारणा ही केव्हातरी करण्याची गोष्ट नसून ती एक दैनंदिन जीवनाचे अतूट अंग झाल्यास कोणताही विकार गंभीर रूप धारण करणार नाही. यात न आलेला एक विकार म्हणजे 'इरिटेबल बॉवेल सिंड्रोम' (Irritable Bowel Syndrome - IBS) याचा आपण थोडा विचार करू.

२९१