पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होऊ शकतो. अचानक खूप मोठी लॉटरी लागली म्हणून झालेल्या अत्यानंदामुळे तो माणूस हसू लागला व हसता हसता त्याला मृत्यू आला. चिंता (Anxiety) व धोराचा क्षणार्धात झालेला तीव्र आघात यांत मूलतः असा फरक आहे की, हा आघात भयानक तीव्र असू शकतो. भीती असतेच परंतु आघातात तीव्रता प्रचंड असते. काही लक्षणे जरी समान असली तरी तीव्र चिंता, असत्य काळजी व काहीतरी भयानक होणार आहे किंवा यात आपला मृत्यू होणार आहे अशा भावना असतात. हा एक प्रकारे मानसविकार असतो. तीव्र धास्तीचा आघात (Panic Attack) हे मेंदूच्या न्यूरोट्रान्समीटर्समध्ये घडणाऱ्या अचानक बदलामुळे घडत असतात. हे न्यूरोट्रान्समीटर्स शरीराला खोटेच संदेश पाठवतात व त्यामुळे ज्याला आपण लढा किंवा पळा' (Fight or Flight) म्हणतो हे मानस तयार होते. पण सत्यात असा काहीही धोका नसतो.

 प्राणीशास्त्राप्रमाणे (Biology) शरीरात लॅक्टिक अॅसिडची उत्पत्ती होत असते; व ते रक्तप्रवाहात असल्यामुळे त्याला शरीर असा प्रतिसाद देत असते. याच्या जोडीला काही विचार, काही न आवडणाऱ्या घटना घडल्या तर असा पॅनिक अॅटॅक येऊ शकतो. अनेक शारीरिक आजारांत, विशेषतः ते सुरुवातीच्या काळात असतील तर त्यातूनही धास्ती, घबराट व डिप्रेशन यांची निर्मिती होऊ शकते. या स्थितीचा स्वतंत्र स्तरावर अभ्यास झाला व उपचार झाले तर ते जास्त श्रेयस्कर ठरेल. काही वेळा सुरुवातीसच पॅनिक अॅटॅक येतो व पुढे त्याची सवय होऊन त्या परिस्थितीशी शरीर जुळवून घेते. येथे देहमनाचा संबंध विचारात घ्यावा लागतो. मूलतः हा . संबंध, अँग्झायटी व पॅनिक अॅटॅक एक असतो, शरीराचा प्रतिसादही एकसारखाच असतो. येथे मनःशांती मिळविण्यासाठी अध्यात्म कामी येते.
 संशोधनातून असे निष्कर्ष काढले गेले आहेत की आपले श्वसन, बोलणे.व बोलण्याचा विषय, त्यावर चर्चा हे शारीरिक प्रतिसादांना कारणीभूत असते. आपण जर वेगाने बोलत असू, सतत, विश्रांती न घेता बोलत राहत असू तर आपला रक्तदाब वाढतो, थोडी उलघाल सुरू होते. आपला श्वासोच्छ्वास सावकाश (पण पूर्ण) व्हावयास पाहिजे. असा श्वासोच्छ्वास म्हणजे जणू पेशींना संदेश की “सर्व काही ठीक आहे, मी निवांत आहे." असे हे स्वगत म्हणजे आपणास आपणच

२९५