पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/२९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिलेले निश्चिंतीचे आश्वासन.
 अँग्झायटी ही समस्या ज्यांना जवळजवळ काहीच काम नसते किंवा सतत ताण येत असूनही कर्तव्यकर्म सोडता येत नाही, अशांचे बाबत घडते.
वैद्यकाच्या साहाय्याची जरुरी :
 काही वेळा अशा येतात की या समस्येवर आपले आपण मात करू शकत नाही. अशा वेळी वैद्यकीय साहाय्य अटळ ठरते. या समस्येवर उपयुक्त अशी अनेक औषधे आहेत. यांना अँटीअँग्झायटी (Antianxiety) किंवा अँटीडिप्रेझन्टस् (Antidepressants) वा निद्रा आणणारी (Sleeping Medications) असे म्हटले जाते. परंतु ही तात्पुरते किंवा समस्या गंभीर असेल त्याच वेळी घ्यावीत कारण यांनाही अंती दुष्परिणाम असतातच. ही औषधे घेतानाही आपण एक यज्ञकर्म करतो आहोत या श्रद्धेने घ्यावीत. श्रद्धा म्हणजे विश्वासाचे उच्च स्वरूप. श्रद्धेच्याही वरची पायरी म्हणजे निष्ठा. निष्ठेमध्ये आपले सारसर्वस्व पणाला लावावयाची मानसिक शक्ती असते. देशनिष्ठेपायी मृत्यूलाही हसत हसत सामोरे जाण्याचे धैर्य अनेक देशभक्तांनी दाखवलेले आहे. ईश्वरावर संपूर्ण भार टाकून कोठल्याही समस्येला निर्भयपणे तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी निष्ठेतून निर्माण होत असते. त्या मानाने विकार ह्या छोट्या समस्या असतात.
 औषध घेतल्यावर सुमारे एक तास ते अर्धा तास या कालानंतर त्या औषधाचे सुपरिणाम जाणण्यासाठी श्रद्धेने अंतर्मुख व्हावे. शिवाय मनाशी एक खूणगाठ बांधावी की ही तात्पुरती व्यवस्था आहे व नंतर आपली ध्यानधारणा आपल्या उपयोगी पडणार आहे.
योगसाधना :

येथेही मागे पाहिल्याप्रमाणे योगसूत्रे उपयोगी पडतात. या वेळी शवासनासहित ध्यान हे जास्त उपयोगी पडू शकेल. कारण त्यामध्ये प्रथम शरीर शिथिल करणे व मन निर्विकार करण्याचा प्रयत्न करणे, हे महत्त्वाचे आहे. पाश्चात्य 'मानसचित्र ' प्रकार शोधणाऱ्या त्रयीने "यावेळी अॅड्रेनलिनची पातळी वाढते, ते अँड्रेनलिनच हळूहळू कमी होत आहे अशी कल्पना करण्यास सांगितले आहे. जणू एका नळावाटे

२९६