पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चारापाणी, खुराक देऊन त्यांना वाढवले होते. त्यांनी कधीही मारहाण केली नाही.ते मोठे बैल झाले.अप्पांचा आवाजच काय पण पायरवही ते ओळखत असत.अप्पांनी दिल्याशिवाय चाऱ्याला तोंडही लावत नसत.पुढे अप्पा त्यांना आपल्या सावट गाडीला जुंपू लागले.पण त्यांनी कधीही चाबूक वापरला नाही. अप्पांना हवे तसे,हव्या त्या चालीत नुसत्या शब्दांनी ते चालावयाचे.अप्पांचा त्यांच्यावर व त्यांचा अप्पांवर पिता-पुत्रवत जीव होता.पुढे अप्पा आजारी पडले. वृद्ध होतेच.शेवटपर्यंत ते त्या जोडीची वास्तपूस करत होते.अप्पा नाहीत म्हणून त्या जोडीने खाणेपिणे सोडले होतेच.शेवटी त्या आजारपणात अप्पा गेले.अप्पांचा मृतदेह उचलून अंगणात आणण्यात आला.त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आले. आणि इकडे त्या जोडीने माना टाकल्या.एकमेकांच्या गळ्यात गळा घालून त्यांनी शेवटचा श्वास घेतला.ही कहाणी काल्पनिक असेल परंतु तो लेखक मात्र प्राणी आणि मानव यांच्या उच्च संबंधावर,उच्च मानसिकतेवर संपूर्ण श्रद्धा असणारा असावा अशी आज मनोमन खात्री पटते.
 अशीच एक कहाणी फार पूर्वी वाचलेल्या 'द क्लॉईस्टर अॅन्ड द हार्थ' (The Cloister & the Hearth) यात आहे ती मी आजही विसरू शकलेलो नाही. प्रेमभंगाच्या भावनेतून नायक संसारातून मुक्त होतो.ख्रिश्चन धर्माप्रमाणे संन्यास घेऊन मठीत (चर्च) वास्तव्य करू लागतो.या धार्मिक भावनेतून तो प्राणीमात्रावर प्रेम करू लागतो.अनेक पक्षी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या अंगाखांद्यावर खेळू लागतात,त्याच्या हातातून धान्यकण वेचून घेऊन खात.ही कहाणी ही काल्पनिकच आहे.परंतु ती लेखकाचे मन, त्याचा मानव व प्राणी यांच्या मनाची एकरूपता होऊ शकते यावर विश्वास ठेवणारेच होते.वाङ्मयात विशेषतः कथा,कादंबऱ्या (आणि कवितासुद्धा) यांत कल्पनाशक्तीचा विलास आढळतो.पण ह्या कल्पनेलाही आधार तुमचे मन, तुमची प्रतिभा हेच असते.
 आजही कुत्र्यांच्या प्रमाणे गाई, म्हशी,शेळ्या मालकाचा आवाज ओळखतात,अत्यंत विश्वासाने त्यांना प्रतिसाद देतात.ते सहृदय मालकही त्या प्राण्यांची भाषा जाणू शकतात,त्यांच्या भावभावना ओळखतात.प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी प्राणी व आपण यांची 'वेव्ह लेंग्थ' जुळल्याचा अनुभव येतोच. ह्याचा अनुभव तीव्रतेने जे लोक शाकाहारी आहेत त्यांचे बाबत येतो.त्यांच्या प्राणिहत्येबाबतच्या २९