पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
  • आपल्याला पूजा, जप, ध्यानधारणा अशा गोष्टींपैकी कोणती गोष्ट आवडते? * आपण धार्मिक कार्यक्रमांत भाग घेता का?
  • आपला ईश्वर अथवा आदिशक्ती यावर विश्वास आहे का ?
  • मनापासून केलेली प्रार्थना यश देते यावर आपला विश्वास आहे का?
  • आपले मन पूर्णपणे निर्विकारी, निर्विचारी करण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? हल्ली ध्यानधारणेचा फार बोलबाला झाला आहे. आपली ध्याना- विषयी काय कल्पना आहे? आपण ध्यान करत असाल तर त्यामुळे किती फायदा झाला? झाला नसल्यास तो का झाला नाही याविषयी चिंतन करता का ? का ते फक्त कर्मकांड होते ?
  • आपण मृत्युंजयाचा मंत्र किंवा असे इतर मंत्रांचे पारायण करता का? किंवा रामरक्षा, गीता अशा ग्रंथांचे पठण करता का ?
  • कोठल्याही परिस्थितीत आपण शांत राहू शकता का?
  • भोवतालची परिस्थिती - वैयक्तिक व कौटुंबिक- यामुळे येणारे ताण असह्य होतात का ?
  • दुसऱ्याच्या दुःखात मनापासून वाटेकरी होण्याची आपणाला इच्छा असते ? * आपला परिसर नष्ट होत आहे. अरण्यनिवास म्हणजे मनःशांती, यासाठी असा एकांतवास आपणास आवडतो का?
  • समाजासाठी आपण आपल्या कुवतीनुसार काहीतरी करावे अशी ओढ आपणास आहे का? असल्यास आपण काय करता ?
  • आजचा भोगवाद हा समाजाची हानी करत आहे हे आपणास मान्य आहे का? असल्यास आपण अगदी खारीचा वाटा म्हणून काही प्रयत्न करता का ?
  • साधी राहणी व उच्च विचारसरणी यावर आपला विश्वास आहे का ?

ही प्रश्नावली मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत जाईल. असे अनेक प्रश्न आपले आपणच स्वतःला विचारू शकतो व त्यातून आत्मसंशोधन करू शकतो. हे काही

३०१