पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृद्धत्व म्हणजे आयुष्याची सायंकाळ. कै. भा. रा. तांबे यांची "मधु मागी माझ्या सख्या परी-मधुघटची रिकामे पडती जरी" ही कविता तशी अविस्मरणीय आहे. वृद्धत्व म्हणजे वयोमानानुसार होत गेलेला शारीरिक न्हास. शारीरिक हास हा नैसर्गिक असतो. पण हा इतका हळूहळू होत असतो की दीर्घकाळ आपल्याला त्याची जाणीव होत नाही. ( जोपर्यंत शारीरिक क्षमता चांगली आहे तोपर्यंत . ) म्हणजे सत्तरीचा वृद्धही पूर्णपणे कार्यरत राहू शकतो. मनाने तो तरुणच असतो. परंतु अकाली येणारे वृद्धत्व ही शोचनीय स्थिती. शेवटी मृत्यू हा सर्वांना येणारच असतो. अकाली वृद्धत्व व अकाली मृत्यूला आपल्या बालपणातील कुपोषण, तारुण्यातील आरोग्याकडे दुर्लक्ष व ताणतणावांखाली सतत असणे हेच मुख्यतः कारण असते. वृद्धत्वातील समस्या ह्यांना अनेक पदर असतात. त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष, कौटुंबिक पाठिंबा नसणे, आर्थिक अडचणी इत्यादी. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे आहार, जो वृद्धापकाळी लागणारी सर्व पोषक द्रव्ये देईल अशा आहाराच्या उणिवा . तेव्हा जन्म ते मृत्यू हा संपूर्ण कालखंड 'पोषण' या विषयाकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक असते. याच बरोबर आहाराला आणखी दोन विचारार्ह पैलू आहेत आणि ते पोषणशास्त्राइतकेच महत्त्वाचे आहेत. (१) आहार हा फक्त शरीराचेच पोषण करतो असे नाही तर तो मनही घडवत असतो. (याची पूर्ण चर्चा

३०७