पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या ‘आहार - एक यज्ञकर्म' या पुस्तकात केली गेली आहे.) आपल्या आयुर्वेद, गीता इत्यादी ग्रंथांत याची सविस्तर चर्चा आहे. मनुष्यात जशा 'वात, पित्त व कफ' याप्रमाणे प्रकृतिदोष असतात, स्वभाव सात्त्विक, राजसिक व तामसिक असतात, त्याचप्रमाणे अन्नसुद्धा सात्त्विक, राजसिक व तामसिक असते. तेव्हा आहार हा आधुनिक शास्त्राप्रमाणे पोषक व परंपरेप्रमाणे सात्त्विक असावा. (२) अन्न ग्रहण करताना आनंदी मनाने, आनंदी वातावरणात घेतले तर ते जास्त a. नाही नुसते पोट भरणे नाही, ते एक यज्ञकर्म आहे
.  वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
 सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
 जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म ।
 उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।
हा श्लोक पूर्वी नियमित म्हटला जावयाचा. यात किती खोलवर अर्थ भरलेला आहे याचा विचार केला तर जाण येते. ज्या कालखंडात शारीरिक शक्ती कमी होतात, मनही हळुवार होत असते त्या काळात उत्तम आहाराची विशेष जरुरी असते. याची तात्त्विक बाजूची प्रदीर्घ चर्चा ' आहार - एक यज्ञकर्म' या पुस्तकात आली असल्यामुळे त्या खोलात न शिरता आपण आधुनिक पोषणशास्त्राचा विचार करू. हे शास्त्र पूर्णपणे वैज्ञानिक असून हळूहळू परिपूर्णतेला जात आहे. यावर अखंड संशोधन चालू होते, आज आहे व भविष्यातही चालू राहणार आहे. कारण विज्ञानाला क्षितिजाप्रमाणे अंतिम मर्यादा नसते
.  आहार आणि शारीरिक हास :
 शरीराची वाढ पूर्ण झाली की शरीराचा कणाकणाने -हास होत असतो. त्याची जाणीव बहुधा आपल्याला लवकर होत नाही. वयोमानानुसार आपल्या गरजाही बदलत असतात, त्याची पूर्ण जाणीव आपणास पाहिजे. आपण अगदी झोपून राहिलो तरी आपल्याला ऊर्जा लागतेच. याला ऊर्जेची पायाभूत गरज (Basal Metabolic Requirement - B.M.R.) असे म्हटले जाते. ही जन्मभर कायमच असते. परंतु एकूण कार्यानुसार आपण जी ऊर्जा खर्च करत असतो, तेवढी ऊर्जा परत निर्मिती झालीच पाहिजे. ही ऊर्जा वयोमानानुसार बदलत जाते व तसे बदल आपल्याला३०८