पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करावे लागतात. असे बदल शेवटपर्यंत करत राहावे लागतात. नाहीतर अयोग्य पोषणाचे आपण बळी होऊ. आपला आहार कमीजास्त असेल, पोषक घटक नीट मिळत नसतील तर शरीरासही वाढत जातो व त्यामुळे वार्धक्य व अकाली दुर्बलताही अयोग्य प्रमाणात वाढत जाते. ह्याची काळजी खरे म्हणजे ऐन तारुण्यापासूनच सुरू व्हावयास पाहिजे. त्या कालखंडात प्रत्येक तरुण चविष्ट, पोटभर व रोज बदल देणारा आहार घेत असतो. पण रोगग्रस्ततेचा येथेच पाया खोदला जातो. पूर्वी फारशी हॉटेल्स नसत. घरी मुद्दाम पोषणाचा विचार करून कधीच स्वयंपाक होत नसे. त्या भागात ऋतुमानाप्रमाणे निर्माण होणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्या नित्य आहारात असत. चवीसाठी निरनिराळ्या चटण्या, कोशिंबिरी, पापड, पापड्या हे व असेच सणवार, द्वादशी या वेळी गोडधोडाचे अनंत प्रकार होत. यांत पोषण व हवा असलेला बदल यांना पोषक आहार असे. आता याच्या ऐवजी फास्ट फूड, चविष्ट व कुपोषक पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. वयं वाढत जाते तसे अनेक विकारांचे हल्लेही सुरू होतात. मग अध्याय सुरू होतो औषधोपचाराचा. सतत दवाखान्यांचे उंबरे पूजले जातात. तीव्र औषधांच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते. ज्याला आपण जीवनाची गुणवत्ता म्हणतो, तीच कमी कमी होत जाते. निरामय जीवन व जीवनाची गुणवत्ता या काही वेगळ्या गोष्टी नाहीत. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत.

 आपणास लागणारी ऊर्जा कार्बोहैड्रेट्स, प्रथिने व तैलपदार्थ यातून मिळत असते. याचेही शास्त्रीय प्रमाण ठरलेले आहे. हा विषय माझ्या 'मधुमेह' व 'हृदयविकार' या पुस्तकात तपशीलवार चर्चिला आहे. तेव्हा त्याची पुनरावृत्ती नको. शिवाय 'आहार' या विषयावर अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत. येथे आपण अयोग्य आहारामुळे काय समस्या निर्माण होतात एवढाच विचार करू. तो वृद्धत्व अथवा शारीरिक -हास हा दोन महत्त्वाच्या कारणांशी निगडीत आहे. वंशपरंपरेने (Genetically) याचा आराखडा आपल्या पेशीतच आखलेला असतो. तसेच तो आपल्या परिसराशीही निगडीत असतो. शरीरात वयानुसार होणारे 'हार्मोनल' बदल हे अनेक बदल घडवून आणत असतात. हे आपण व आपल्या कुटुंबीयांनी समजून घेतले तर अकाली व अयोग्य -हास होणार नाही. आपल्या शरीरात एंडोक्राईन ग्रंथी संस्था ही अत्यंत महत्त्वाची संस्था. त्या संस्थेच्या कार्यशक्तीत होणारा -हास

३०९