पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढील गोष्टीमुळे होऊ शकतो -

  • पेशींचे हार्मोन रिसेप्टर्स असतात त्यांची शक्ती कमी होणे.
  • या रिसेप्टरवर हार्मोन्सचा संयोग कमी होणे.
  • हे हार्मोन्स निर्माण करणाऱ्या पेशी आहेत त्या पेशी मरण पावणे ( Aptosis).
  • पेशी कर्करोगी होणे.
  • आपली हायपोथॅलॅमिक अकार्यक्षमता.

वृद्धांना खालील विकार लवकर होत असतात :
 (१) स्थौल्य (Obesity) : याचे महत्त्वाचे कारण बी.एम्.आर्. (Basal Metabolic Requirement) हार्मोनल बदलाच्या प्रमाणात कमी होत असते. त्यामुळे स्थौल्य येते. जरुरी कमी व खाणे जास्त म्हणजे हे होणारच.
 (२) हृदयविकार : शरीरातील स्टेरॉइड हार्मोन्सची निर्मिती कमी होते. त्यामुळे कोलेस्टरॉलची रक्तातील पातळी वाढू शकते व एल्. डी. एल् व एच्. डी. एल्. (L.D.L. : H.D.L.) हे प्रमाण सुयोग्य राखणारे 'एस्ट्रोजेन' हे हार्मोन कमी होते व अँथिरोस्क्लेरॉसिस हा विकार होतो.
 (३) ऑस्टिओपोरॉसिस (Osteoporosis) : यालाही अनेक कारणे असली तरी महत्त्वाचे कारण म्हणजे कॅल्शियमचा चयापचय नीट होत नाही. कॅल्शिअम कमी घेतले गेल्यामुळे हाडांचा -हास होऊ शकतो (Bone Loss) व शारीरिक श्रमही कमी झाल्यामुळे त्यावर परिणाम होत असतो.
 (४) रक्तदाब (High Blood Pressure / Hypertension).
 (५) मधुमेह : पॅन्क्रियाज् मधून इंस्युलिनची निर्मिती कमी होणे व त्याची गुणवत्ता कमी होणे.
 वयानुसार सुयोग्य आहार, व्यायाम, योगसाधना यामुळे हे पुष्कळ प्रमाणात टळू शकते. ३१०