पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करतो. अनेक सूक्ष्म पोषक घटक असे कार्य करत असतात. यामुळे अनेक प्रकारे फायदा होत असतो. तेव्हा त्यामुळे शरीराची होणारी शक्तिवाढ (अ) व वृद्धत्वाकडे होणारी वाटचाल मंद करण्यात होणारी कार्यक्षमता (ब) यांचा नमुना पाहू.
 (१) कॅल्शिअम : (अ) हाडांत असणारे कॅल्शिअम व त्याची पातळी सतत योग्य ठेवणे. (ब) ऑस्टिओपोरॉसिसला प्रतिबंध व अपघात किंवा जबर मार यामुळे होणारे अस्थिभंग रोखणे व झाल्यास तो भाग लवकर पूर्ववत करणे.
 (२) लोह : (अ) प्रतिकारशक्ती वाढते. (ब) संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्याची शक्ती वाढवते.
 (३) लोह / फॉलेट : (अ) रक्तक्षयाला प्रतिबंध व झाल्यास तो बरा करणे. (ब) वृद्धत्वात सुद्धा वयोमानानुसार कार्यक्षमतेची योग्य पातळी राखणे.
 (४) सेलेनिअम : चयापचयामध्ये शरीरात 'ऑक्सिडंटस्' नावाची विषद्रव्ये तयार होत असतात. ही विषद्रव्ये नाहीशी करणारे घटक म्हणजे अँटिऑक्सिडंटस्. (अ) सेलेनियम हे अँटीऑक्सिडंट आहे. (ब) शरीरात निर्माण होणाऱ्या 'फ्री रॅडिकल्समुळे' होणारे नुकसान टाळणे, हे सेलेनिअम करते.

 (५) व्हिटामिन अ ( बीटा करोटिन), ॲस्कॉरबिक अॅसिड, व्हिटामिन 'ई' लायकोपिन. (अ) ही सर्व अँटीऑक्सिडंटस् म्हणून उपयोगी पडतात. (ब) फ्री रॅडिकल्समुळे होणारा अॅथिरोस्क्लेरॉसिस (हृदयविकार), मोतीबिंदू, कर्करोगाची निर्मिती, स्नायूंचा -हास या गोष्टी थांबवतात. ही सर्व नैसर्गिक वनस्पतिजन्य तेलात असतात. पण रिफाइन्ड तेलात ती नष्ट झालेली असतात, आपल्याला तेल खाऊ नका तूप खाऊ नका, त्याच्यामुळे कोलेस्टरॉल वाढेल, हृदयविकार होईल अशी भीती घालण्यात येते. पण हे जर सत्य असेल तर पूर्वी फारसा माहीत नसलेला हा रोग आज प्रथम क्रमांकाचा मारक रोग का झाला आहे? पूर्वी भरपूर तेल-तूप खाण्यात असे. त्यामागचे विज्ञान आपल्या पूर्वजांना माहीत नव्हते. पण आज विज्ञानाने कोलेस्टरॉल हा आपणा सर्वांचा शत्रू नसून मित्रच आहे हे सिद्ध झाले आहे. कोलेस्टरॉल हे पेशींचे मेंब्रेन, काही बाईल ॲसिडस् यासाठी जरूर असते. त्यामुळे लिव्हर दररोज एक ते दीड ग्रॅम कोलेस्टरॉल तयार करतच असते. असे हे

३१२