पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोलेस्टरॉल सतत रक्तावाटे सर्व शरीरभर खेळते राहिले पाहिजे. त्याशिवाय पेशींचे पोषण नीटपणे होणार नाही. परंतु कोलेस्टरॉल असते घट्ट व त्याचा द्रावणबिंदू आहे ३००° फॅ. आणि शरीराचे तापमान असते फक्त ९७° ते ९८°. अशा घट्ट स्वरूपातील कोलेस्टरॉलचा थर रक्तवाहिन्यांच्या भित्तिकांवर बसणारच. त्याला निसर्गानेच सोय केली आहे. 'लेसिथिन' हे फॅटी अॅसिड जर तेलात असेल तर हा द्रावणबिंदू १८०° फॅ. इतका सुद्धा पुरतो. परंतु हाही तसा उच्च आहे. यापुढे 'लायनोलिक व लायनोलेईक' ही फॅ. अॅसिडस् जर योग्य प्रमाणात असतील तर ही समस्याही दूर होते. हे प्रमाण दहापेक्षा खाली असेल तर हा द्रावणबिंदु ३२° इतका खाली येतो. निसर्गाचे हे वरदान आपण जाणून घेतले तर कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी औषधे घेण्याची वेळच येत नाही. गोळ्या चालू असतील तर त्या सहज बंद होतात. वनस्पतिजन्य तेलात कोलेस्टरॉल नाही. निरनिराळ्या तेलांची रचना थोडी वेगळी असते. काही तेलांत सॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् कमी असतात, तर काहीत जास्त असतात. काहींचा Omega 6 / Omega 3 हा रेशो उच्च असतो तर काही तेलांत कमी. पण अशी तीन तेले मिसळून वापरली तर जास्त चांगले. उदा. शेंगदाणा, करडई (किंवा सूर्यफूल ) व तीळ ही समप्रमाणात मिसळली व नित्य दोन चमचे तूप खाल्ले तर ते आरोग्यदायी ठरते. आहारात भरपूर चघळचोथा असेल तर तेल हा चिंतेचा अथवा टाळावयाचा विषय नसून तो आरोग्यदायी आहे हे ध्यानात येईल.

 आहार शेवटी आपला आपणच ठरवावा. त्याची मार्गदर्शक तत्त्वे काय? त्याचा विचार करू. शास्त्रीय दृष्ट्या तज्ज्ञांनी मनुष्याचे तीन प्रकार गृहीत धरले आहेत. (१) बैठे काम करणारे (२) मध्यम श्रम करणारे (३) अतिशय कष्ट करणारे. ओघानेच त्यांची ऊर्जेची जरुरी ही वेगळी असते (मधुमेह व हृदयविकार ही पुस्तके पाहा ) आय्. सी. एम्. आर. (Indian Council of Medical Research) यांनी याचे शास्त्रीय कोष्टक दिलेले आहे. या विचारात व्यक्तीव्यक्तीचा स्वतंत्र विचार करणे व्यावहारिक दृष्ट्या अशक्य असते. त्यांचा विचार लिंग, वय, प्रकृती यानुसार आपणच करावयास पाहिजे. हे घटक सर्वसाधारण विचार शास्त्रीय असूनही होत नाहीत. यासाठी काय नियम करावेंत हे पाहू. वयोमानानुसारं चयापचय बदलत जातो. म्हणून या बदलांची आवश्यकता. दुसरे म्हणजे निरनिराळ्या समस्या

३१३