पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वृद्धापकाळांत निर्माण होत असतात व त्यानुसार आहारातही बदल होणे इष्ट असते. तेव्हा आपला आय्. सी. एम्. आर. वा इतर तज्ञांनी दिलेला प्रमाणित आहार असा बदलावा -
 १) वयाच्या ४० नंतर ५% उर्जा कमी घ्यावी.
 २) वयाच्या ५० नंतर वरील उर्जेच्या आणखी १०% कमी करावी.
 ३) साठीनंतर ही ता १०% कमी करावी.
 याचे उदाहरण घेऊ. पुरुष, वजन ६० किलो, बैठा व्यवसाय, यांची गरज शास्त्रीय दृष्ट्या २४२५ कॅलरीज असते. त्यांत कसा बदल होईल.
 १) वय ४० नंतर उर्जेची जरुरी २३०० कॅलरीज.
 २) वय ५० नंतर उर्जेची जरुरी २२०० कॅलरीज.
 ३) वय ६० नंतर उर्जेची जरुरी १७९० कॅलरीज. ७० नंतर १७०० कॅलरीज. म्हणजे साठी नंतर फक्त १७०० कॅलरीजचा आहारही पुरू शकेल. या आहाराची विभागणी कशी असावी.
 १) कर्बोदके ६०% उर्जा.
 २) प्रथिने १५ ते २०% उर्जा.
 ३) तैल पदार्थ २० ते २५% उर्जा.
प्रथिनाचे शास्त्रीय प्रमाण एक ग्रॅम प्रति १ किलो वजन असे आहे. पण वृद्धापकाळी उर्जेप्रमाणे ते कमी होते. एवढे तैलपदार्थ खाऊनसुद्धा कधीही कोलेस्टरॉल वाढत नाही. उलट जेवढी उर्जा जास्त घेतली जाते त्याच प्रमाणात लिव्हर जास्त कोलेस्टरॉल निर्माण करते. अति खाणे म्हणजे रुग्णता. मिताहार हाच श्रेष्ठ.

 दुसरा मुद्दा असा की कच्चे अन्न सलाड, कोशिंबीर, मोड हे वृद्धांनी खावे किंवा नाही. कच्च्या पदार्थांची एकतर आपणास सवय नसते आणि वृद्धापकाळी चयापचय

३१४