पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नीट होत नसल्यामुळे कच्चे पदार्थ नकोत. अन्न हे मऊ पाहिजे. कच्चे पदार्थ वाफलल्यावरच मऊ होऊ शकतात. यासाठी वृद्धापकाळी जे बदल व्हावेत ते असे -
 १) अन्नाकडे उदरभरण म्हणून न बघता म्हणजेच नुसता पोटभर आहार घेण्याऐवजी कॅलरीज कमी व पोषक द्रव्ये पुरेपूर असा आहार असावा. क्षार, जीवनसत्वे व ट्रेस एलिमेंटस् यावर मुख्य भर असावा.
 २) अन्न पदार्थ चविष्ट असावेत परंतु तिखट नसावेत. मसाले कमी वापरावेत.
 ३) अन्न पदार्थ अत्यंत मऊ असावेत. पेस्टप्रमाणे किंवा एकवेळ पातळ पदार्थ चालतील परंतु कडक नकोत.
 ४) दिवसांत आहार दर ४ ते ५ तासांनी घ्यावा.
 ५) स्वतः ला विकार असेल तर त्याला अयोग्य अन्न सोडून काहीही पदार्थ खावेत.
 ६) दूध हा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे जे जरुरी असते. परंतु दूध पचावयास जड. दिवसा २ - ३ ग्लास ताक व रात्री झोपतांना गरम दूध घ्यावे. याने झोपही उत्तम लागते.
 (७) पालेभाज्या, फळभाज्या, घेवडा जातीच्या शेंगा (Beans) नियमित आहारात असाव्यात. पण भाज्या परतून (Fry करून ) नको. खालील सूप उत्तम व तसा अनुभव आहे.
 सूप :
 (१) पालेभाजी - १ जुडी - देठे / डेखे टाकू नयेत.
 (२) १ वाटी (३) कोबी, फ्लॉवर.
 (३) १ वाटी बीन्स
 (४) १ वाटी मूग, मटकी, वगैरे (मोड आणून )
 (५) टोमॅटो - कांदा लसूण वगैरे

 (६) सलाड म्हणून घेतो ते काहीही पदार्थ.

३१५