पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शकते” यामुळे वृद्धापकाळचे अनेक विकार होऊ शकतात. ज्यांना आपण सूक्ष्म पोषक घटक म्हणतो याची प्रत्यक्ष किती जरुरी असते हे पूर्वी तितकेसे माहीत नव्हते. हे जे सूक्ष्म घटक आहेत त्यांचे वैज्ञानिकांनी दोन भाग केले आहेत. (१) मॅक्रो - मोठे व (२) मायक्रो म्हणजे सूक्ष्म, यातील मॅक्रो (Macro) घटकांची जरूरी आता आहाराच्या प्रति केजीस किती ग्रॅम या प्रमाणात सांगितले जाते, तर मायक्रो (Micro) घटक हे प्रति किलो किती मिलीग्रॅम ह्या स्वरूपात सांगितले जातात.
जैवरसायनशास्त्रानुसार जरुरी (Biochemical Role) :
 पुढील सूक्ष्म पोषक घटक (शरीर) जैवरसायनशास्त्रानुसार आवश्यक असतात.
 (१) लोह (Iron)
 (२) तांबे (Copper)
 (३) मँगेनीज (Manganese)
 (४) कोबाल्ट (Cobalt)
 (५) मॉलिब्डेनम (Molybdenum)
 (६) सेलेनिअम (Selenium)
 (७) जस्त (Zinc)
पुढील सूक्ष्म पोषक घटक इंद्रिय हासामुळे (Physiological Impairment) जरुरी दर्शवतात.
 (१) फ्लुओराइड (Fluoride)
 (२) क्रोमियम् (Chromium)
 (३) व्हॅनॅडियम् (Vanadium)
 (४) लिथियम् (Lithium)

 (५) शिसे (Lead)

३१७