पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(६) सिलिकॉन (Silicon)
(७) बोरॉन
 या सर्वांची मूलभूत गरज किती हे तितकेसे स्पष्ट नाही परंतु जरुरी आहे, एवढे निश्चित. वृद्धापकाळी क्षारांची जी कमतरता उद्भवते, त्याचे कारण बहुधा जरुरीपेक्षा कमी व अयोग्य अन्नग्रहणात असते. येथे दोन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात (१) शास्त्रीय दृष्ट्या 'शिफारस केलेली आहारातील जरुरी' (Recommended Dietary Allowance / RDA) व ' दैनंदिन अपाय न होणारे व जरुरी पूर्ण करणारे ' ( Estimated Safe and Adequate Daily Dietary Intake / ESADDI). पण आपणा सामान्य माणसांना एवढे शास्त्रीय ज्ञान बहुधा नसते. मग तुम्ही - आम्ही काय करावे? आहारातील कोणत्या वस्तूत कोणते सूक्ष्मघटक आहेत हे समजले तरी पुरे. अशी कोष्टके सहजप्राप्त असतात. एवढे मात्र खरे की आपल्या आरोग्यासाठी दुसऱ्यावर फार अवलंबून राहू लागू नये यासाठी थोडेसे मूलभूत ज्ञान असावे ( माझे ज्ञानही इतपतच आहे). यासाठी आहाराचा सर्वसाधारण आराखडा आपणच करावा. यात ऊर्जेसाठीची जरुरी हा एक भाग होईल व दुसरा भाग पोषक घटकांचा. पहिला व्यक्तीव्यक्तीनुसार बदलणारा / अस्थिर तर दुसरा वयोमानानुसार बराच स्थिर. यात बालके, तरुण, मध्यमवयीन व वृद्ध असे चार गट पडतील. या गटांचेही उपगट पाडता येतात (Refinement) परंतु एवढे खोलवर आपणास व्यवहारात जाण्याची फार गरज नसते.
आहाराचा आराखडा : (मधुमेह - हृदयरोगही पुस्तके पाहा)
 हा आराखडा (Diet plan) बऱ्याच अंशी आपला आपणच बनवू शकतो. त्यासाठी खालील गोष्टींचा विचार पायाभूत ठरतो.
 (१) आपले वयोमानानुसार आदर्श वजन ठरवून त्यावर आहार ठरवावा.
 (२) या आदर्श वजनानुसार आपली ( अ ) ऊर्जेची (ब) पोषक घटक यांची जरुरी ठरवून घ्यावी.

 (३) ऊर्जा कोणत्या वस्तूमधून किती मिळते हे विज्ञानाधिष्ठित आहे. परंतु त्यात बऱ्याच व्यावहारिक अडचणी येऊ शकतात. पण त्याचा अति विचार करण्याची

३१८