पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही फक्त काव्यमय कल्पनाच होती का? का बून फक्त आपल्या भावनाच सांगत होता? बूनची खात्री आहे की असं काहीही नव्हतं. घडलं ते सत्य होतं. बून पुढे म्हणतो -
"आयुष्यात प्रथमच जाणीव झाली की मी बौद्धिक स्तरावर एका प्राण्याशी संवाद साधत होतो. एका दृष्टीने मी असा नशीबवान की एक प्राणी आपण स्वतः पुढाकार घेऊन माझ्याशी आपल्या बुद्धीने, आपल्या विचाराने संवाद साधत होता. ही गुणवत्ता फक्त सुशिक्षित माणसांमध्येच असते अशी सगळ्यांचीच कल्पना असते. पण इथे एक कुत्राच होता आणि ही गुणवत्ता त्याला होती हा प्रत्यक्ष अनुभव आला." यावर काही संशयात्मे निश्चित म्हणतील की ही बूनची फक्त कल्पनाशक्ती होती. आपण ह्याची दुसरी बाजू विचारात घेतली पाहिजे. काय असते की प्रत्येक प्राण्याची शरीररचना वेगळी असते. मानवाची स्वरयंत्रणा ही इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळी आहे. त्यात मनुष्य आवाजाचे रूपांतर शब्दांत करू शकतो. परंतु मानवा - मानवात सुद्धा एका जमातीची भाषा दुसऱ्या जमातीला येत नाही. चिनी, जपानी, कोरियन किंवा युरोपमधल्या अनेक भाषा आपल्याला कुठं येतात? हे कशाला, भारतातील निरनिराळ्या भाषांपैकी आपल्याला किती येतात? अनेक वेळा आपण मूकपणे देहबोलीने बोलत असतो. तशी प्रत्येक प्राण्याची बोली बऱ्याच इतर प्राण्यांना येत असते. काही प्रमाणात आपले कुत्र्या-मांजरासारखे प्राणी पाळलेले व त्यांच्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या व्यक्तींना ते बऱ्याच अशी 'मानव' असल्याचा विश्वास असतो. ते आपल्या पाळीव प्राण्यांशी बोलतात, ते प्राणीही निरनिराळे सूर, देहबोली यावाटे मालकाशी बोलत असतात.
 जंगलातील निरनिराळ्या प्राण्यांचा वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लोकांना हे अनुभव आले आहेत. ते प्राणी या संशोधकांना आपल्यापैकी एक समजत असतात. चिंपांझीचा अभ्यास करणारी 'गुडाल' हिचा हाच अनुभव होता. एल्सा ही सिंहीण व जॉर्ज यांचे संबंध असेच होते. मध्यंतरी 'नॅशनल जिओग्राफिक' या चॅनेलवर लांडग्यांच्या जीवनावर एक सीरिअल आली होती. लांडगे म्हणजे अति क्रूर प्राणी, ते शेळ्या, मेंढ्या व तत्सम प्राणी नष्ट करतात म्हणून दिसला लांडगा की घाल गोळी कर खलास हा रिवाज झाला होता. त्यांची शिकार करणाऱ्यांना 'लांडगे ३४