पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नैसर्गिक देणगी त्याच्याजवळ होती परंतु आधुनिक काळात ती नाहीशी झाली. अति प्राचीन काळी जेव्हा शेतीसुद्धा नव्हती तेव्हाचा मानव पोटासाठी कितीही मैल भटकला तरी काही काळाने आपल्या मूळ स्थानी सहज परत येत असे. " पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन, मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी फिरेन" कवी म्हणतो. दैव मला कोठेही नेवो मी मातृभूमी विसरू शकत नाही. वेगळ्या अर्थाने हीच कहाणी त्या काळातील आदिवासींची होती. आज ज्या गोष्टींचे आश्चर्य वाटते त्या गोष्टी पूर्वी नैसर्गिक व सर्वांना लाभलेल्या देणगीमुळे होत असत. ही जी देणगी आहे तिला आपण मात्र मुकलो आहो. या देणगीला इंग्लिश नाव पी.एस्.आय्. (P.S.I.) असे आहे. पी. एस्. आय. हा ग्रीक शब्द आहे. तो अनेक सर्वव्यापी, परामानसशास्त्रीय गोष्टींबद्दल वापरला जातो. तीच ही देणगी. ही कुत्र्यांना, मांजरांना, पक्ष्यांना निश्चितपणे असते असे अनेक पुरावे गोळा केले आहेत. असा एक किस्साच पाहू.
 बॉबी नावाची एक तरुण कुत्री तिला पाळणाऱ्या कुटुंबाबरोबर ओहायओपासून त्या कुटुंबाच्या नव्या घरकुलाकडे ओरेगांवकडे प्रवास करत होती. इंडिआनामध्ये अल्पकालीन प्रवासखंडात बॉबी नाहीशी झाली. त्या कुटुंबाने शोधायचा खूप प्रयत्न केला परंतु ती न सापडल्याने नाइलाज म्हणून त्यांनी पुढला प्रवास सुरू केला. ओरेगांवला जाऊन त्यांनी आपले नवे घर वसवले. जवळजवळ तीन महिन्यांनी बॉबी त्या नव्या घरी हजर झाली. ती बॉबीच होती, तिच्यासारखी दिसणारी दुसरी मादी नव्हती. तिकडच्या पद्धतीप्रमाणे तिच्या गळ्यात तिचे नाव-पत्ता असणारा पट्टा होता. अंगावरच्या जुन्या खुणाही होत्या. ही गोष्ट वर्तमानपत्रांत ठळक टाइपामध्ये झळकली होती.
 ही वाचून चार्ल्स अलेक्झँडर नावाच्या इसमाला कुतूहल वाटून त्याने याचा शोध घेण्याचे ठरविले. त्याने इंडियाना ते ओरेगांव येथील अनेक वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या. भटक्या कुत्र्यांविषयी प्रेम बाळगणारे लोक तिकडे खूप असतात. त्यांनी बॉबी आपल्याला भेटल्याची व नंतर तेथून निघून गेल्याची हकीकत कळवली. या लोकांच्या ठिकाणानुसार चार्ल्सने एक नकाशा तयार करून बॉबीचा प्रवासमार्ग त्यावर नोंद केला. त्याला असे आढळले की बॉबीने खूपच सुयोग्य मार्ग शोधला ३८