पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. त्यात आडवळणे फारच थोडी होती. एका घरून दूरवर नेऊन सोडलेले कुत्र्या- मांजरासारखे प्राणी आपण समजू शकतो. कारण हा अनुभव नेहमीचा आहे व ते प्राणी सहज घरी परत येतात. परंतु बॉबीला ओहायओ येथील घरच फक्त माहीत होते, ओरेगांवचे नव्हते. कुत्रा हा मानवाचा अगदी जवळचा मित्र; सातत्याने जवळ राहणारा प्राणी. त्यामुळे त्याचा अभ्यास करणे तुलनात्मक दृष्ट्या कमी कष्टाचे. पण इतर जंगली प्राण्यांचे काय? हरणांबद्दल - ती दूर नेऊन सोडली तर त्यांच्या मातृस्थानाला परत येऊ शकतात का? हाही एक प्रयोगाचा विषय. त्यावर झालेला अभ्यास आपण पाहू.
 रॉय बेडचेक हा एक सृष्टिपदार्थवेत्ता (Naturalist), निसर्गाचा अभ्यासू आणि तज्ज्ञ. हा एक अपवादात्मक उत्कृष्ट लेखकही होता अशी त्याची ख्याती होती. त्याची ती जागा म्हणजे 'अरान्सस राष्ट्रीय उद्यान'. यात जवळ जवळ ४७००० एकर जमीन आहे. त्यांत सर्व प्रकार आहेत. पाणथळ (Marsh), खारवट (Salt), ताजे स्वच्छ पाणी असलेल्या नद्या, वाळवंटी प्रदेश, गवताळ राने वगैरे. हे उद्यान म्हणजे जंगली प्राण्यांचे आश्रयस्थान. येथे त्यांना निर्भयपणे हिंडता येते. या प्राण्यांत सर्वांत जास्त संख्या हरणांची, तेथल्या रानावर जगू शकणाऱ्यापेक्षा जास्त हरणे निर्माण झाल्यावर त्यांतील जास्त हरणे दुसऱ्या रानात नेऊन सोडावयाचे ठरले. हरणे पकडून त्यांच्या कानाला एक धातूची चकती व तिच्यावर त्याची थोडी ओळख असे करून त्यांना काही वेळा शेकडो मैलांवर नेऊन सोडण्यात आले. हरणांना आपले ठराविक निवासस्थान अतिप्रिय असते. ही हरणेही त्याच ओढीची. त्यांना ऊन सोडलेला प्रदेश व हा मूळ प्रदेश यांत अनेक गावे, कुरणे, शेतजमिनी, रांचेस, शहरे होती. या सर्व मार्गांत कुत्री व मानवासारख्या त्यांच्या जिवावर टपलेल्या शत्रूंना तोंड देत देत ही हरणे त्यांच्या मूळ संरक्षित क्षेत्रात परत आली. अशा अनेक कथा बेडिचेकने लिहून ठेवल्या आहेत. १९४० साली बराच काळ बेडिचेकने त्या संरक्षित क्षेत्रात घालवला होता. १९४२ साली एका हरिणीला सापळ्यात पकडून तेथून ९० मैलांवरील गोलिआड ह्या पश्चिम क्षेत्रात सोडण्यात आले. हीच मादी बरोबर २१ दिवसांतच मूळ क्षेत्रात परत सापळ्यात सापडली.
 ह्या प्रयोगात प्रत्येक प्राण्याची स्वतंत्र ओळख पटविणाऱ्या खुणा नमूद केल्या ३९