पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असल्यामुळे त्यात चूक होण्याचा वा अंदाज करावा लागण्याचा प्रश्नच नव्हता. बेडिचेकने अशा अभ्यासातच जन्म कंठला होता. त्याला सुद्धा अतोनात आश्चर्य वाटत असे. तो म्हणतो, "अशी काही भावना, किंवा आत्यंतिक ओढ या प्राण्यांना जिवाची पर्वा न करता मूळस्थानाकडे खेचून नेत असे.” एक अभ्यासू याला ईश्वरी मार्गदर्शन म्हणेल तर दुसरा याला उपजत ज्ञान म्हणू शकेल. परंतु ही गोष्ट अद्भुत, बुद्धिगम्य ज्ञानाच्या पलीकडीलच म्हणावी लागते. ही अद्भुतता नंतर अशी वाटेनाशी होईल, जेव्हा मन ह्या गोष्टीचा खोलवर विचार होतो. सर्वविश्वव्यापी मन हे सर्वांचे एकच आहे यामुळे हे घडत असावे. असाही एक मतप्रवाह असू शकतो की तांत्रिक किंवा मांत्रिक मनः सामर्थ्याने जसा भूत व भविष्यकाळात वावरू शकतो (Shamanism) तसे हे घडत असावे. या पंथाच्या धारणेप्रमाणे निरनिराळे प्राणी व मानव यामध्ये निःशब्द संवाद घडत असावा. आणि या धारणेप्रमाणे बेडीचेकच्या अभ्यासातील हरणे व त्यांना घेऊन जाणारे लोक यांच्यांत असा संवाद का घडला नसावा. डॉ. रॉबर्ट एल्. मॉरिस हे डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना येथील मानसशास्त्रीय संशोधन केंद्राचे एक अधिकारी. त्यांचे मुख्य कार्य म्हणजे मानसशास्त्र संबंधित संशोधनाचे सुसूत्रीकरण करणे हे होय. ते म्हणतात -
 "जमीन, पाणी आणि आकाश यांत वावरणाऱ्या सर्व प्राण्यांचे नातेसंबंध सत्य व स्पष्ट होते. हे प्राणी व पक्षी यांचेमध्ये एक बंधुत्वाचे नाते होते, त्यामुळेच लकोटा (सू) हे त्यांच्याबरोबर निर्भयपणे जगू शकत होते. यांतील काही सू तर या केसाळ प्राणी व पक्षी यांच्या इतक्या जवळिकीचे होते की या बंधुत्वाच्या नात्याने ते एकमेकांत समान भाषेत बोलत असत."<vr>

 ख्रिश्चन समाजातील एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे संत फ्रान्सिस असीसी. या संताचा वरील सिद्धान्तावर पूर्ण विश्वास होता. हा संत स्वभावाने अतिशय शांत, सद्गृहस्थ होता अशी सामान्यांची धारणा होती. त्याचे सर्व प्राणीमात्रांवर अत्यंत प्रेम असून तो चिलटाला सुद्धा धक्का लावत नसे. परंतु लिन व्हाईट ज्यु. याने थोडे वेगळे मत मांडलेले आहे. प्रो. लिन व्हाईट हा रेनेसन्सचा (१४ ते १६व्या शतकांतील कला, वाङ्मय यांचा अभ्यास व पुनर्जीवन ) इतिहासकार होता. तो म्हणतो, "सेंट फ्रान्सिस हा येशूनंतर होऊन गेलेला 'आमूलाग्र सुधारणावादी' (Radical) होता.

४०