पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आज एकूणच जगातील मानवजातीचे जे चित्र दिसते आहे ते हृदयविदारक आहे. एखाद्या साथीप्रमाणे पसरलेल्या भोगवादाची परिणती म्हणून शारीरिक व मानसिक व्याधी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याग या शब्दाची जागा अत्याचार या शब्दाने घेतली आहे. अमेरिका ह्या अत्यंत संपन्न व सामर्थ्यवान देशात आपणास जे मिळत नाही ते दुसऱ्याकडून ओरबाडून घेण्याची वृत्ती वाढत आहे. न्यूयॉर्कसारख्या शहरात एकट्या दुकट्याने हिंडण्याची सोय राहिलेली नाही. मध्यंतरी अशी एक भयानक बातमी आली होती की समोरून आलेल्या व्यक्तीच्या अंगावर असणारे उंची जॅकेट त्याला गोळी घालून काढून घेऊन तो गुंड पळून गेला. भारतातही मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथे होणाऱ्या खंडणी, खून, मारामाच्या यांच्या बातम्या अत्यंत खेदकारक आहेत. ह्या हकीकती म्हणजे व्यक्ती वा टोळीचे अत्याचार. परंतु अत्यंत श्रीमंत असूनही अनेक राष्ट्रे विकसनशील किंवा मागास राष्ट्रांकडून लूटमार - पण अत्यंत सभ्य दिसेल अशी करून आपली तुंबडी भरतात.
 यावर पद्मपुराणातील एक कथा म्हणजे सात्त्विकता व मोहापासून मुक्तीची एक नमुनेदार व आदर्श वर्तणूककथा आहे. एका गावात एक शूद्र राहत होता. तो लोभ आणि मोह यापासून पूर्ण मुक्त होता. कष्ट करून जी कमाई होईल, त्यातूनच संसार चालवावयाचा ही त्याची दिनचर्या. यातून आनंदात दिवस व रात्री शांत निद्रा याचे सुख तो अनुभवावयाचा. आपण सुख म्हणतो ती असते मनाची स्थिती. हा आनंद कधीच व कोठेही विकत मिळत नाही. लोभ असेल तर अधिकाधिक धन मिळवण्याचा मोह टाळता येत नाही, आणि योग्यतेपेक्षा जास्त धन प्राप्त झाले की त्याचा उन्माद डोक्यात चढतो, चंगळवाद स्वार होतो. हीच शिकवण तो आपली पत्नी व मुलांना देत असे.

 एकदा भगवंतांनी त्याच्या निर्मोही मनाची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी नदीकाठी, पायवाटेवर एका करवंटीमध्ये एक सोन्याचे नाणे ठेवले. ती करवंटी व त्यातील सोन्याचे नाणे त्या शूद्राला दिसले. परंतु त्याने ती करवंटी बाजूला सरकवून वाटचाल पुढे चालू ठेवली. मग भगवंत धोब्याचे रूप घेऊन नदीकाठी आसनस्थ होऊन लोकांना भूत व भविष्य सांगू लागले. या धोब्याची कीर्ती ऐकून त्या शूद्राची पत्नी तेथे गेली व त्या धोब्यास आपले भविष्य विचारले. तो धोबी म्हणाला, "बाई, तुमच्या पतीला

४९