पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवणारी किंवा भिकाऱ्यांना देणारी माणसेही दिसतात. त्यातलाच हा प्रकार). आपण आई-वडिलांचे प्रिय आहोत. आपलेच दान का नको? ह्या विचाराने त्याने वडिलांना विचारले, “पिताजी, माझे दान द्या ना! कोणाला देता?" प्रथम वाजश्रवस गप्प बसला. पण नचिकेताने परत परत पृच्छा केल्यावर वाजश्रवस रागाने म्हणतो, “मी तुला यमाला दान करणार आहे." यमाला दान म्हणजे साक्षात मृत्यूच. पण छोटा नचिकेत विचारवंत होता. त्याने विचार केला की 'जन्म आणि मरण हे अगदी स्वाभाविक आहे. तृण जसे उगवते व कालांतराने नष्ट होते, परत उगवते परत नष्ट होते. तीच गोष्ट मानवाची. तेव्हा आपण आनंदाने यमाकडे जावे.'
 नचिकेता यमधर्माकडे गेला. तेव्हा यमधर्म यमलोकात नव्हता. तो परत यावयास तीन दिवस लागले. तोपर्यंत नचिकेता अन्नपाणी न घेता वाट पाहत बसून राहिला. यमधर्म परत आल्यावर या छोट्या बालकाची ती निष्ठा पाहून यमाच्या मनात माया व आदर निर्माण झाला. त्याने नचिकेताला तीन वर मागण्यास सांगितले. नचिकेताने पुढील तीन वर मागितले -
 (१) माझ्या पित्याचा राग शांत होवो व त्याला माझी परत ओळख पटो.
 (२) ज्या अग्नीची उपासना केल्यामुळे मानव जिथे भूक नाही, तहान नाही, जरा (वृद्धत्व) नाही, मृत्यू नाही, जेथे फक्त आनंद आहे अशा स्वर्गलोकात जातो त्या अग्नीचे पूर्ण ज्ञान मला दे.
 यमधर्माने दोन्ही वेळा "तथास्तु" म्हटल्यावर नचिकेताचा तिसरा वर असा होता -
 (३) मला आत्म्याचे पूर्ण ज्ञान दे.

 आत्म्याचे ज्ञान इतके सहज कोणासही मिळत नाही. त्यासाठी प्रदीर्घ तपश्चर्येची आराधना करावी लागते. म्हणून यमधर्म का कू करू लागला. तो म्हणाला " तकनि याचे ज्ञान होत नाही. तू संपत्ती, घोडे, गोधन काही माग, ते तुला देतो." अशा अनेक प्रलोभनांना नचिकेता बळी पडला नाही. शेवटी त्याची तीव्र जिज्ञासा पाहून यमधर्माने त्याला हे ज्ञान दिले. " न जायते म्रियते वा विपश्चिते" (कृष्णाने अर्जुनाला

५८