पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐक्य उद्घोषित केले होते. 'स्वयंज्योतिः' आत्म्याच्या अस्तित्वाविषयी जी निश्चितपणाची भावना असते तिचा काही अंश ब्रह्मतत्त्वास आपोआप मिळतो. भृगु कुलातील वारुणी आपल्या पित्याकडे गेला व म्हणाला, “भगवन्, मला ब्रह्म शिकवा.” पित्याने त्याला अशी व्याख्या सांगितली -
 "ज्याच्यापासून ही सर्व भूते निर्माण होतात, ज्याच्यामुळे ती जिवंत राहतात व विनाशसमयी ती ज्याच्यामध्ये विलीन होतात ते ब्रह्म होय. " (भूते = प्राणी)
 निरनिराळ्या उपनिषदांत शब्द वेगळे असले तरी त्या 'विविधतेतून एकता'असे ब्रह्माचे स्वरूप आपणास दिसते. अद्वैत वेदान्तमतातील चार महावाक्यांपैकीएक आरुणीने श्वेतकेतूला सांगितले ते असे -  
  "एतदात्म्यमिदं सर्वं, तत्सत्यं, स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो”
 उपनिषदांत ब्रह्माची दोन प्रकारची वर्णने आहेत. (१) ते अविकारी, भेदरहितआणि निर्गुण आहे; (२) ते विकार पावून जग निर्माण करणारे, बहु होणारे व शुभगुणांनी युक्त असे आहे. या मतभेदातून शंकराचार्यांनी वाट काढली, ती अशी कीनिर्गुण ब्रह्म हे खरे अंतिम तत्त्व अथवा परब्रह्म होय. त्याचे ज्ञान ही पराविद्या होय(श्रेष्ठ विद्या आहे.) सगुणत्व आणि विकारित्व सांगणारे वर्णन हे गौण आहे. हे ज्ञानम्हणजे अपराविद्या. ह्याचाही खुलासा शांकरमतात सापडतो. "ब्रह्म हे वास्तविकनिर्गुण आहे, पण मायेमुळे त्याच्यावर सगुणाचा आरोप केला जातो._सुगण ब्रह्म हेउपासनेला उपयोगी पडते. सामान्यांना हे सहज पटते."
 या विषयावर आपल्याला काही खोलवर जावयाचे नाही. कारण तो आपलामूळ विषय नाही. परंतु दैनंदिन जीवनात मी कोण? कोठून आलो? कोठे जाणारआहे? आपल्या जीवनाचा अर्थ काय? जन्म आणि मृत्यू यांचे विश्लेषण आपल्याऋषिमुनींनी हजारो वर्षांपूर्वी या विषयाचा अभ्यास केला होता. त्यांनी जे निष्कर्षकाढले त्याचे विहंगावलोकन हाच आपला उद्देश आहे.
नीतिशास्त्र :
 नीतिशास्त्राचा अभ्यास म्हणजे व्यक्ती (आणि समाजही) यांचे परमप्राप्तव्य

काय याचा शोध. या समस्येची उकल व या प्रश्नाचे उत्तर उपनिषदांनी दिले आहे.

६१