पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्य केले आहे. प्रजापतीने मनुष्याला 'द' हा एकाक्षरी उपदेश केला. 'द' याचा अर्थ द्या - दान करा असा आहे. पण दान करावयाचे ते श्रद्धेने, औदार्याने व अत्यंतनम्रभावाने द्यावे ( तैत्ति. २.३). तैत्तिरीय उपनिषदात 'शिक्षा' अध्यायात गुरूनेशिष्याला पुढील उपदेश केला आहे. “सत्यं वद, धर्मं चर, मातृदेवो भव, पितृदेवोभव.... यानि अस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानी नो इतराणी ।"
 कर्माची बंधकता याच्या अंतर्गत असलेल्या बुद्धीत असते, केवळ बाह्य भौतिक कृतीत नसते. ईशोपनिषदात म्हटले आहे "न कर्म लिप्यते नरे|" म्हणून कर्मे करीत शंभर वर्षे जगावे, जगण्याची उमेद धरावी. केवळ आत्मचिंतनात जगण्याने अमृतत्व मिळत नाही. कृतिशील जीवन जगले पाहिजे. अविद्येने (कर्माने) मृत्यू ओलांडून विद्येने (ध्यानाने) अमृतत्व मिळते. (ईश. ११)
 अमृतत्व हे मानवाचे खरेखुरे श्रेय आहे. मोहापोटी केवळ बाह्यरूपाने आकर्षक भासणाऱ्या प्रेयालाच मानव श्रेय समजतो. प्रेय आणि श्रेय यातील संघर्ष कठोपनिषदात फार सुरेख रंगवला आहे. नचिकेताचीच कहाणी पाहू. यमधर्माने त्याला रथ, घोडे, संपत्ती, अप्सरा या माग असे सांगितले. नचिकेताला ह्या गोष्टी प्रेय असल्या तरी श्रेय नाहीत हे माहीत असल्यामुळेच त्याने या गोष्टींना नकार दिला व आत्म्याचे ज्ञान हेच खऱ्या अर्थाने श्रेय आहे हे जाणून तेच मागितले. श्रेय हेच सत्यरूप असते. आपल्या आयुष्यात श्रेय आणि प्रेय या गोष्टींची सरमिसळ झालेली असते. पण बुद्धिवान माणूस प्रेय सोडून श्रेयाचा स्वीकार करतो. ( क. १.२-३). "हिरण्मयेन पात्रेन सत्यस्याभिहितं मुखम् ” ( ईश. १५). मानव त्या आकर्षणालाच सत्य समजू लागतो. पण हे आकर्षण दूर झाले की सत्याची प्राप्ती होऊ शकते. तेव्हा आत्मज्ञान हेच खरेखुरे श्रेय आहे. विवेकाने जो आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारतो तो मृत्युसमयी असा निश्चिंत असतो, हा माझा आत्मा ब्रह्म आहे. मेल्यावर असा माणूस ब्रह्मरूप होतो असे शांडिल्याने म्हटले आहे. (छां.३-१२). पुनर्जन्माविषयी कोठेही संभ्रम आढळत नाही. आत्मा एक देह सोडून दुसरा धारण करतो.
भगवद्गीता :

 निरनिराळ्या उपनिषदांत विभिन्न तात्त्विक विचारांचे दर्शन आहे. परंतु सर्व

६३