पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचप्रमाणे तो जीर्ण देह टाकून नवा धारणा करतो. आत्मा हा अजर व अमर आहे. अर्थात गीतेमध्ये ते उपनिषदांमधूनच आले आहे.
निद्रामीमांसा, श्रमवाद व पूरीतत वाद:
 मृत्यूच्या खालोखाल महत्त्वाचा प्रश्न म्हणजे निद्रा निद्रा हे मरणाचे छोटे भावंडच आहे. आचार्य विनोबा भावे यांनी हेच तत्त्व सांगितलेले आहे. ते म्हणत, "मी रोज मरण पावतो व रोज जन्माला येतो." निद्रा हे छोटे भावंड म्हणून हा काल रात्री- पुरता मर्यादित असतो. पण मृत्यूनंतर म्हणजे प्रदीर्घ निद्रेतून जागे होता येत नाही. मात्र पुनर्जन्माने नवीन जीवन मिळते. हे तत्त्व पटणे. तसे अवघड वाटले तरी चिंतनातून पटण्यास हरकत नाही. उपनिषत्कारांना पुनर्जन्माविषयी जराही संशय नाही हे सहज जाणवते. उपनिषदात निद्रेची जी मीमांसा केलेली आहे ती बऱ्याच अंशी आधुनिक संशोधनाशी मिळतीजुळती आहे. उपनिषदात असे म्हटले आहे की " गृध अथवा दुसरा पक्षी आकाशात उडत असताना विश्रांतीसाठी घरट्याकडे पंख मिटून धाव घेतो, तद्वतच हा पुरुष गाढ निद्रेचा आश्रय करतो. त्याला कसलेही स्वप्न पडत नाही. गाढ निद्रेत त्याला कोणत्याच विषयाची इच्छा होत नाही." हे उपनिषदातील विधान आधुनिक शास्त्राशी थोडेफार जुळणारे आहे. झोपेच्या दोन स्थिती असतात. एक गाढ निद्रा यालाच उपनिषदात 'सुषुप्ती' असे म्हटले गेले आहे. परंतु नवीन संशोधनानुसार गाढ झोप व अर्धझोप (REM - Rapid Eye Movement) अशी स्थिती आळीपाळीने चालू असते. गाढ झोप म्हणजे जणू अल्पकालीन मृत्यूच - इतका मनुष्य जागृतावस्थेच्या पलीकडे असतो.
 पण एवढा भाग सोडला तर इतर मते मात्र चमत्कारिक व न पटणारी किंबहुना आजच्या दृष्टिकोनातून अशास्त्रीय वाटतात. त्यामुळे येथे चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. आपण एवढेच म्हणूया की सुषुप्तिस्थिती म्हणजे अत्यंत गाढ निद्रा व अर्धझोप (REM) म्हणजे 'स्वप्नावस्था' असे उपनिषदकार मानत होते. ते शास्त्रीय आहे.
स्वप्नमीमांसा :

 सुषुप्ती हा शब्द निद्रा या अर्थीच वापरला गेला आहे असे दिसते. बृहदारण्य- कोपनिषदात एके ठिकाणी असे म्हटले आहे की, स्वप्नात हा आत्मा आपल्या

७१