पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे असे जो ध्यान करतो तो सदैव जिवंत सहतो." (छां. उपनिषद) .
 या सर्व गोष्टींचा अर्थ अर्वाचीन मानसशास्त्र, आधुनिक विज्ञान या दृष्टिकोनातून करावा लागतो. हे अखिल विश्व ऊर्जेचीच निरनिराळी रूपे आहेत. जन्म - मृत्यूचे उपनिषदांनी केलेले विवरण, पुनर्जन्माची कल्पना ह्या गोष्टी मनाला पटतात - निदान शांती देतात.
आध्यात्मिक मानसशास्त्र :
 (१) अनात्मिक मानसशास्त्र :
 प्राचीन मानसशास्त्र व अर्वाचीन मानसशास्त्र यांत मूलभूत फरक दिसून येतो. उपनिषदांतील आत्मा ही कल्पना नष्ट झाली असून त्याऐवजी 'अहं'ची कल्पना उद्भूत झाली असे प्रो. जेम्स वॉर्डने म्हटले आहे. हा 'अहंभाव ' जन्मभर एखाद्या वेताळासारखा मनुष्याच्या मानगुटीवर बसून राहतो व तेथून तो निघता निघत नाही. काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की, हा 'अहं' देहावसानानंतरही राहतो. प्राचीन ऋषींच्या अमर 'आत्म्या' च्या ऐवजी या आधुनिक 'अहं' ने जागा घेतली. आहे. पण याची कल्पना प्राचीन ऋषींनाही असावी. मागे आपण पाहिले की याज्ञवल्क्य ऋषीने आपली पत्नी मैत्रेयी हिला असे सांगितले की आपल्याला प्रेय असलेली प्रत्येक गोष्ट स्वतः करिता असते. उपनिषदांत 'आत्मा' आहे असे स्पष्टपणे गृहीत धरले आहे. तो अमर आहे व देहावसानानंतर नवीन देहात तो शिरतो. तोच पुनर्जन्म.
 (२) उपनिषदांमध्ये -
 (१) शरीरात आत्म्याचे स्थान
 (२) हृदय व मेंदूत आत्म्याचे वास्तव्य
 (३) आत्मा व शरीर यांचा संबंध

 (४) आत्मा अणोरणीयान महतो महीयान आहे - म्हणजे तो अणूपेक्षाही लहान (अति अति सूक्ष्म ) व मोठ्यात मोठा म्हणजे सर्व विश्व व्यापूनही उरला आहे. ह्या संकल्पना पूर्वी आपण पाहिल्या आहेत. तेव्हा ती चर्चा परत करण्याचे कारण

७५