पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन आणि आत्मा



 विकारमुक्तीच्या कार्यात उपचारापेक्षाही मनःशक्तीचा जास्त उपयोग होतो. तात्त्विक दृष्ट्या मन व आत्मा यांत फरक असला तरी व्यावहारिक स्तरावर त्यांचे रूप एकच आहे. हा फरक कळावा, आत्म्याचे ज्ञान व्हावे म्हणून आपण मागे उपनिषदांचे सार समजावून घेतले. मनःशक्तीच्या जोरावर आरोग्य मिळवणे कसे शक्य होते हे समजावून थोडी चर्चा व त्याला पूरक काही सत्य घटना उदाहरणे म्हणून पाहूया. यांत भारतीय नव्हे तर पाश्चात्य देशांतील काही अनुभवसिद्ध कहाण्या पाहू.
 आधुनिक विज्ञानाचे अंतिम निकष म्हणजे एका अर्थी अद्ययावत ज्ञान, विषय काहीही असो, याच्या प्राप्तीचा मार्ग काय ? त्या त्या शास्त्राची निरनिराळ्या प्रयोगाद्वारे माहीती मिळवावयाची व परत परत प्रयोग केले तरी तोच निष्कर्ष निघत असेल तरच तो सिद्धान्त म्हणून स्वीकारला जातो. सर्व भौतिक शास्त्रांची प्रगती याच मार्गाने झाली आहे व पुढेही विकासाचा हाच मार्ग राहणार आहे. आधुनिक मानसशास्त्र असेच विकसित झाले आहे. वैद्यकीय मानसशास्त्र हे अत्यंत विकसित असे जरी गृहीत धरले जात असले तरी त्यालाही अनेक मर्यादा आहेत. काही विकारांच्या बाबत तर आजही उपाय खुंटतात. याचे कारण म्हणजे कोठल्याही शास्त्राचा विकास हा एखाद्या साखळीसारखा असतो. त्यात अनेक दुवे एकाला एक ७९