पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कधीही सिद्ध करता येत नाही. देह व मन यांचे अंतरीचे व बाह्य अशी दोन व्यक्तिमत्त्वे आहेत हे अनेक प्रकारे सिद्ध झालेले आहे. आपण आज विचार फक्त अध्यात्म व वैद्यक एवढाच करतो आहोत. तेव्हा त्याबाबत वैद्यक शास्त्रातील पाश्चात्य तज्ज्ञांना आलेले अनुभव काही उदाहरणांसहित आपण पाहूया.

 यासाठी पाश्चात्य तज्ज्ञांनीच मंजूर केलेले दोन मार्ग पाहूया. या आधुनिक तत्त्वज्ञानानुसार मानवाचे या विश्वातील स्थान जाणून घेण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे मानवाचे दिसते ते रूप. यात मानव हा एक साधा प्राणीच आहे व त्याचे मनाचे स्थान मेंदूत आहे. यामुळे आपले जीवन संपले की मनाचाही अंत होतो. परंतु अनेक पाश्चात्य तत्त्ववेत्ते म्हणतात की, ही जी मनाविषयी कल्पना आहे ती चमत्कारिक, हास्यास्पद व वस्तुस्थितीशी विपरीत आहे. याच्या बरोबर विरुद्ध मत की मन हे अजर, अमर, विश्व व्यापून राहणारा आकाररहित घटक आहे. त्याला काल व विश्वाचा विस्तार यांनी जखडलेले नाही. आपली बुद्धी तशी अतिशय चोखंदळ असते. तिला पटो वा न पटो आपणाला अमरत्वाचे व सर्वत्र अस्तित्वाचे ईश्वरी गुण मिळालेले आहेत. त्यामुळे आपण पामर आहोत, पापी आहोत असे काही धर्म सांगत असतात, ते बरोबर नाही. आपण परमेश्वराचाच अंश आहोत व आपल्याजवळ तशीच दैवी शक्ती आहे. पण ही आहे सुप्तावस्थेत. खरी समस्या आहे ती ही शक्ती जागृत कशी करावयाची ? ती जागृत झाली तर आपण स्वतःचेच नव्हे तर एकूण मानवजातीचेच हित करू शकू. याला तीव्र विरोध करणाऱ्या दोन शक्ती आहेत. एक तथाकथित धार्मिक कल्पना व आधुनिक विज्ञान. बंधने आपणाला अशी जखडून टाकतात की आपण आपला आत्मा व त्याची अपरंपार शक्ती जागृत करू शकत नाही. आज मानवजातीची इतकी अवनती झाली आहे की आपणच हवा, पाणी व निसर्ग यांची विल्हेवाट लावत आहोत व आपल्या अंताकडेच स्वेच्छेने धावत आहोत. उद्या जर मानवानेच मानवजात नष्ट केली तर विश्वाचे काहीही बिघडणार नाही. उलट विश्वाचा परिसर परत स्वच्छ पूर्ववत होईल. आजची स्थिती टाळावयाची असेल तर आपण आपल्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे व त्याच्या जागृतीमुळे आपला नाश टाळू शकू, असे विचार अनेक थोर पाश्चात्य शास्त्रज्ञ व तत्त्वचिंतकांनी प्रगट केलेले आहेत. अंतर्मनाची शक्ती अफाट आहे. त्याची दृष्टी सामान्य दृष्टीला न दिसू शकणाऱ्या अनंत गोष्टी

८५