पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सहज पाहू शकते. काही व्यक्तींना काही प्रमाणात ही सिद्धी जन्मजात वरदान म्हणून मिळालेली असते, तर योगी तपश्चर्येने व योगसाधनेने ही मिळवतो. अशी सिद्धी वरदानरूपाने मिळालेल्या व्यक्तींच्या कहाण्या अनंत आहेत. परंतु आपण फक्त वैद्यकशास्त्राशी निगडीत गोष्टी पाहत आहोत. आपल्याकडे लिखित स्वरूपात फारच थोड्या गोष्टी आढळतात. अत्यंत ज्येष्ठ व श्रेष्ठ वैद्यक व्यावसायिकसुद्धा हे कार्य करत नाहीत. परंतु पाश्चात्यांकडे हे काम निष्ठेने करणारे अनेक लोक आहेत. आधुनिक काळातील डॉ. डॉसी हे एक. त्यांचे काही अनुभव आपण पाहू. काही व्यक्तींना मनःचक्षूंची देणगी असते. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी समजतात.
काही आश्चर्यकारक कहाण्या :  सारा ह्या स्त्रीचे ऑपरेशन चालू होते. ऑपरेशन उत्तम झाले व शेवटी टाके घालण्याची वेळ आली. त्या क्षणी काय कारण झाले परमेश्वर जाणे, परंतु साराचे हृदय अचानक बंद पडले. काय कारण असावे ? भुलीचा परिणाम ? रक्तातील काही दोष? का काही न समजलेल्या शारीरिक व्यथा, ज्या हृदयाशी निगडीत असू शकतात? मॉनिटर परत एकदम व्हेंट्रिकलचा अताल (Ventricular Fibrillation) दाखवू लागला. नेहमी हृदयाचे ठोके नियमबद्ध, तालात येत असतात. पण अतालता म्हणजे ठोक्यांचे वादळ. परंतु ते वादळ एक मिनिटातच थांबले कारण त्या भूलतज्ज्ञाने क्षणात 'लाइफ पॅक डिव्हाईस' लावला.

 खरे म्हणजे ही शस्त्रक्रिया नेहमीची पित्ताशयात खडे झाल्यावर ते काढून टाकण्याची होती' (Gall Bladder Stones / Calculus) त्या वेळी हे असे का व्हावे हे कोणासच कळले नाही. परंतु सारा वाचली. यात खरी आश्चर्यकारक घटना पुढेच घडली. तिला त्या काळातील घडामोडीचे स्पष्ट चित्र रेखाटता आले हे तिच्यासकट सर्वांनाच आश्चर्यकारक होते. हृदय बंद पडले त्या वेळी झालेले सर्जन्स व नर्सेस यांचे मधील संभाषण ती भुलीच्या अमलाखाली असूनही पूर्णपणे सांगू शकली, तसेच त्या ऑपरेशन रूमच्या आतील संपूर्ण माहीती, ऑपरेशन थिएटर- मधील टेबलावरील चादरीचा रंग, तिला तयार करणाऱ्या नर्सची हेअरस्टाईल, डॉक्टरांची व नर्सेसची नावे वगैरे सर्व गोष्टी तिने पूर्ण वर्णन केल्या. ह्या सर्व गोष्टी तिने संपूर्ण भुलीखाली असूनही त्या भूलतज्ज्ञाने चुकून वेगवेगळ्या रंगाचे मोजे८६