पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घातले आहेत यासह तिने सुसंगतवार वर्णन केल्या. यात बऱ्याच गोष्टींचे आपणास नवल वाटणार नाही. परंतु सारा जन्मजात अंध / जन्मांध होती.
  तिची भूल संपूर्ण उतरण्यापूर्वी तिला तपासायला आलेल्या सर्जनला ती हे सांगू लागली तर त्याने फक्त तिला मायेने थोपटून ह्या कथनाचा विचारही केला नाही. परंतु त्या 'आय्.सी.यू.' (Intensive Care Unit, Critical Care Nurse) नर्स मात्र सहानुभूतीने म्हणाली, "हो असं कधी कधी घडतं. पूर्वी असाच एक पेशंट आला होता दोन वर्षांपूर्वी. हृदयक्रिया बंद पडल्यावर त्याला उपचारानंतर शुद्ध आली. तो आपल्या हृदयरोगतज्ज्ञाला त्याच्या रक्तात असणाऱ्या 'कार्डिअॅक एनझाइम्स'ची पातळी सांगू लागला. त्याच्या या बोलण्याकडे त्या डॉक्टरने लक्ष दिले नाही. परंतु त्याचे बोलण्यातील शब्द न् शब्द खरा होता. डॉक्टरने तिकडे लक्ष दिले असते तर त्याच्या अनेक तपासण्या वाचल्या असत्या."

एंक मात्र झाले की साराचा जीवनाविषयीचा दृष्टिकोनच बदलला. "व्यावहारिक दृष्टीपलीकडेही एक वेगळी दृष्टी आहे. हेच अंतःचक्षू वा मनःचक्षू. त्यांची शक्ती अफाट आहे. ते अखिल विश्वाचे दर्शन डोळे मिटून घेऊ शकतात. ही दिव्यदृष्टी मनुष्याला प्राप्त होऊ शकते.” हा एक प्रकारचा साक्षात्कारच, जो साराला झाला. आपले ऋषिमुनी ध्यान लावून सर्व विश्वाचा प्रवास करावयाचे ह्यावर आपला विश्वास बसू शकत नाही. विज्ञानात हे न बसणारे आहे. परंतु साराची हकीकत ह्याला पूर्ण पुष्टी देणारी आहे. यासंबंधीचा आपल्या तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन आपण पुढे पाहूच.

  मनुष्य देहाच्या अंतर्गत चालणारे शरीरव्यापार पाहू शकतो का? आपले हृदय कसे चालते आहे, इतर अवयवांची स्थिती काय आहे हे स्वतःचे स्वतः कोणत्याही यांत्रिक अवजाराच्या मदतीशिवाय पाहू शकेल का? एखादा अवयव आजारलेला असेल तर त्याला नेहमीपेक्षा काय वेगळे स्वरूप आलेले आहे, नेमका काय आजार आहे हे त्याला स्वतःच्या अंत:चक्षूंनी पाहून सांगता येईल का ? अपवाद सोडला तर प्रत्येक जण हे अशक्य आहे असेच सांगेल. वैद्यक तज्ज्ञ तर ते हसून उडवून लावतील व त्याची टिंगलही करतील, कारण ते विज्ञानाधिष्ठित नाही, शास्त्रीय नाही व अशा गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. पण हेही घडू शकते. भले ती गोष्ट अपवादात्मक

८७