पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



असो. अशी एक कहाणीच डॉ. डॉसी यांनी सांगितलेली आहे तीच पाहू या.
  एलिझाबेथ हिला उटीपोटाच्या डाव्या बाजूस कित्येक महिने सतत येणारे पण सह्य असलेले दुःख वा अल्पशा वेदना होत असत. तिला हा विश्वास होता की या वेदनांचे स्वरूप व कारण आपण अंतर्मुख झालो तर कळू शकेल. किंबहुना हे नीट समजावून घेणे हे तिचे स्वतः चे कर्तव्य आहे. हे इतरांचे काम नाहीच, परंतु तिचे डॉक्टरसुद्धा याचे खात्रीशीर निदान करू शकणार नाहीत. तिचे स्वतःचे निदान मात्र ते यंत्रांच्या साहाय्याने पाहून बरोबर असल्याची पुष्टी देऊ शकतील. यांत्रिक अवजारांनी येणारे चित्र त्यांना नेहमीच नीट वाचता येते असे नाही. फक्त लक्षणावरून ते अंदाज करतील. तिने तिच्या नेहमीच्या पद्धतीने खिडकीजवळ बसून ध्यान लावले. तिच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहिले. वेदना होणाऱ्या जागेत एका मोठ्या गोल वस्तूत सुमारे तीन छोट्या गोल अशा पदार्थांच्या आकृत्या दिसू लागल्या. या छोट्या वस्तू तशा शांत वाटत होत्या. म्हणजेच तिच्याच अवयवावर या छोट्या घटकांनी घर केले होते. हे चित्र अर्धा तास तिला दिसत होते व त्यात काहीही फारसा बदल नव्हता. हे काही मानसिक नव्हते, तर सत्यात ह्या गोष्टींचे अस्तित्व होते ही तिची खात्री झाली.
  काही दिवसांनी ती नेहमीच्या तपासण्यांसाठी डॉ. डॉसींकडे आली. ती सांगू लागली, “डॉक्टर, मला निश्चित माहीत आहे की मला कॅन्सर झालेला नाही. परंतु आमच्या स्त्रीरोगतज्ज्ञाला खूप काळजी वाटते आहे. तो म्हणतो माझी डिंब ग्रंथी (Overy) मोठी झालेली आहे आणि ह्याचे कारण काय हे समजावून घेण्यासाठी बऱ्याच तपासण्यांची जरुरी आहे. पण मी त्याला सांगितले की माझे फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही करणार नाही. म्हणून मी तुमच्याकडे आले आहे.' तेव्हा डॉ. डॉसी व एलिझाबेथ यांच्यामध्ये जो संवाद झाला तो असा :
  डॉ. डॉसी : "तुला कॅन्सर झालेला नाही हे तू कशावरून म्हणतेस?" एलिझाबेथ : " मी माझ्या डिंबग्रंथी स्पष्टपणे पाहू शकते." डॉ. डॉसी : "त्यांचे स्वरूप काय आहे?"

एलिझाबेथ : "माझी उजवी ग्रंथी अगदी सामान्य अशी आहे, परंतु डाव्या ग्रंथीवर तीन पांढरे डाग आहेत."

८८