पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चार पाद म्हणजे अध्यायांत सांगितलेली आहेत. ते असे - ( १ ) समाधिपाद, (२) साधनपाद, (३) विभूतिपाद व (४) कैवल्यपाद. समाधिपादामध्ये पतंजली योगाची व्याख्या, चित्तवृत्तीचा निरोध व समाधी यांची चर्चा करतात. साधनपाद म्हणजे कैवल्यप्राप्तीसाठी जी साधना सांगितली आहे तिची चर्चा. विभूतिपादामध्ये साधनमार्गावर निरनिराळ्या सिद्धी प्राप्त होत असतात, त्यांचे वर्णन आहे. ही प्रचीती म्हणजे योगसाधनेचा योग्य मार्ग आपण अनुसरतो आहोत याच्याच खुणा. अंतिम उद्दिष्ट कैवल्यप्राप्ती आहे. पण अनेक योगी या सिद्धी प्राप्त झाल्यावर त्यांचा व्यावहारिक वापर करू लागतात व तोच कैवल्यप्राप्तीच्या मार्गातील धोंड ठरते. आपणा सामान्य माणसांच्या अपेक्षा तशा थोड्या असतात. कैवल्यप्राप्तीची खरी ओढ असणारी व्यक्ती लाखो लोकांत एखादीच. परंतु आपले जीवन सुखी व्हावे, गंभीर आजार होऊ नयेत, दीर्घायुष्य लाभावे हीच आपली उद्दिष्टे असतात. यामुळे आपली धाव ध्यानधारणेपर्यंतच. त्यातही यम, नियम व प्रत्याहार ह्या तीन गोष्टींची प्राप्ती व्हावी अशी ओढही नसते. मग गुण कोठून येणार? सामान्य माणसे इकडे वळण्याचे कारण मुख्यतः गंभीर आजारापासून मुक्ती व मनःस्वास्थ्य यासाठीच. ही फक्त वरवरची धडपड असते. त्यातही जे निष्ठेने योगाभ्यास करतात, त्यातून त्यांना थोड्याशा शक्ती प्राप्त होतात. अशी उदाहरणे सहज आढळतात. आपल्याकडे यांचे लिखित स्वरूपातील रिपोर्ट जवळ जवळ नाहीतच. पण पाश्चात्य हेच आपले तत्त्वज्ञान समजावून घेऊन निरनिराळ्या प्रयोगांद्वारे यांतील सत्य आणि तथ्य शोधत असतात.

 मनाचे देहावर एवढे प्रभुत्व असू शकते की तुमची प्रतिकारक्षमताही वाढवू शकता, कसलाही विकार बरा करू शकता. यासंबंधी काही कहाण्याच पाहू या.कहाणी एका मेडिकल जर्नलमध्ये झालेली आहे. अरकॅन्सस युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजचे डॉ. जी. रीचर्ड स्मिथ व त्यांची टीम यांनी केलेल्या संशोधनाची आहे. त्यांनी सात व्यक्तींची या प्रयोगासाठी निवड केली व त्यांची प्रतिसादप्रवृत्ती तयार केली. क्षयरोगाच्या या चाचणीसाठी त्वचेवर त्यांना इन्जेक्शन दिल्यावर काय प्रतिसाद मिळतो हे पाहावयाचे हे प्रयोगाचे उद्दिष्ट. एवढ्यासाठी एका हातावर प्रत्यक्ष चाचणी द्रव्य व दुसऱ्यावर फक्त सलाईन द्यावयाचे. प्रथम हे पूर्वतयारीप्रमाणे त्या प्रयोगासाठी निवडलेल्या व्यक्तींना कोणत्या हातावर चाचणीद्रव्य व कोणत्या हातावर सलाईन हे सांगितले होते. नंतर मात्र याच्या बरोबर विरुद्ध हातावर सलाईन

९०