पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व चाचणीद्रव्य टोचण्यात आले. अपेक्षेप्रमाणे चाचणीद्रव्याची रिअॅक्शन योग्य हातावर व सलाईनच्या ठिकाणी काहीही रिअॅक्शन यावयाची जरुरी नव्हती. पण त्यांचे मनाने घेतलेल्या विचारान्वये सलाईन टोचलेल्या ठिकाणी रिअॅक्शन आली व प्रत्यक्ष चाचणीद्रव्य टोचण्यात आले होते तेथे काहीही झाले नाही. म्हणजे मनाचाच देहावर पूर्ण अधिकार असतो व तेथे विज्ञान थोटे पडते हे सिद्ध झाले.
  या प्रयोगात दाखल झालेली एक स्त्री होती. वय सुमारे ४०. . हिला आपण मेरी म्हणूया. मेरीने पौर्वात्य (भारतीय ?) तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास केला होता. ती योगसाधनाही करत होती. त्यानुसार ती रोज सकाळ-सायंकाळ अर्धा ता ध्यानधारणा करत असे. ही साधना तीन वर्षे पूर्णत्वाने करत असल्यामुळे तिला काही सिद्धी - शक्ती प्राप्त झालेली असावी. समाजाच्या ज्ञानासाठी ती ध्यानात असताना शरीराला विज्ञानानुसार प्रतिसाद देण्यास सांगत असे व नंतर ती आकृती मनःचक्षूंसमोर आणून त्या लाल भागावर मन केंद्रित करून हात फिरवीत असे व ती जागा हळूहळू लहान होत होत नाहीशी होत असे. हस्तस्पर्शाद्वारा ती मनाची शक्ती वापरून ती रिॲक्शन पूर्ण नाहीशी करत असे. आणि विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते चाचणीद्रव्य टोचण्याची जागा बदलूनही काही उपयोग होत नसे. प्रतिसाद योग्य जागीच येत असे. यापुढे जाऊन असे आढळून आले की तिच्या शरीरातील थोडे रक्त काढून घेतले तरीसुद्धा त्या नमुना रक्तातील स्वसंरक्षक पेशी (Lymphocytes) शरीराच्या रक्तापासून दूर केल्यावर सुद्धा तिच्या मानसिक शक्तीला योग्य प्रतिसाद देत असत. म्हणजेच तिचा तिच्या मनाचा तिच्या स्वसंरक्षणयंत्रणेवर पूर्ण ताबा होता व त्यानुसार ती त्या यंत्रणेचे कार्य कमी जास्त करू शकत असे.

  या प्रयोगाआधी १९६३ साली स्टीफन ब्लॅक व त्याचे ब्रिटिश सहकाऱ्यांनी असाच प्रयोग संमोहनशास्त्राचा उपयोग पाहण्यासाठी केला होता. क्षयरोगाची चाचणी जर सकारात्मक आली तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला हा विकार भूतकाळात झालेला असणार वा त्याच्या शरीरात त्या जीवाणूंचे अस्तित्व आहे व ते पुढेही राहणार आहे. ही चाचणी म्हणजे फक्त शारीरिक क्षमता दाखविणारी आहे असे विज्ञान म्हणते. परंतु ब्लॅकच्या प्रयोगात ज्यांची ही टेस्ट सकारात्मक आलेली होती त्यांना संमोहित करून असा आदेश देण्यात आला की यापुढे अशा चाचणीला

९१