पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून ते रिपू. आणि प्रेम, माया, श्रद्धा, विश्वास अशा भावनांचे सुपरिणाम होतात म्हणून त्यांना वर असे म्हणता येईल. हे सर्व जर मनाचे खेळ असतील तर त्यांनाही भौतिक स्थान नाही. पण शरीरावर सुपरिणाम होतो असे अनेक उदाहरणांवरून आपल्याला आढळून येते. देहाचे स्वरूप, आधिभौतिक, तर आध्यात्मिक जग है देहापेक्षा अगदी स्वतंत्र. आधिभौतिक गोष्टींचा अनुभव कधीही व कितीही वेळा घेता येतो पण आध्यात्मिक अनुभव अपवादात्मक व त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या उच्च शक्तीवर अवलंबून असतात. म्हणून ते विज्ञानाच्या व्याख्येप्रमाणे सिद्ध करता येत नाहीत. अशरीरी मन हे शरीरावर सुपरिणाम वा दुष्परिणाम करू शकते हे अनेक उदाहरणांद्वारा आपण पाहिले आहे.

  या संबंधाची जाणीव मानवाला त्याच्या आजारपणात व मृत्यूच्या जाणिवेत किंवा आपत्कालीच का होते? या वेळी मनुष्य परमेश्वराला शरण का जातो? दैनंदिन जीवनात आपल्याला याचे अनुभव का येत नाहीत? याचे समाधानकारक उत्तर अध्यात्मात शोधावे लागते. पण असा अनुभव सामान्य माणसांनाही दैनंदिन जीवनात स्वप्नात येऊ शकतो. आपल्याकडे वेदकालापासून 'स्वप्ने' या गोष्टीविषयी अपार उत्सुकता होती असे दिसते. याचे स्पष्टीकरण देताना अनेक तर्क व सिद्धान्त आपलेकडे मांडले गेले आहेत. उपनिषदांप्रमाणे निद्रावस्थेत आपला आत्मा प्रत्यक्ष देहाबाहेर पडून भटकंती करू लागतो हे आपण पाहिले आहे. या स्थितीत तो आत्मा भूत व वर्तमानकाळातच नव्हे तर भविष्यकाळातही जाऊ शकतो - पाहू शकतो. वेदांमध्येही याचे उल्लेख आहेत. अगदी आधुनिक काळात सुद्धा त्याच्यावर बरेच संशोधन झाले आहे ते सविस्तरपणे पुढे पाहू. परंतु मन ही शक्ती आहे व ती परमेश्वराप्रमाणे अमूर्त, सर्वव्यापी, अवकाशात कोठेही असणारी, कालातीत अशी आहे. तेव्हा उन्नत मन कोठल्याही कालखंडात म्हणजे भूत, वर्तमान व भविष्य काळात सहज प्रवास करू शकते असे म्हणणे अशास्त्रीय आहे हे म्हणणे आहे वस्तुस्थितीला सोडून. आत्मा हेही तेच रूप आहे. मग तो निद्रेत देहातून बाहेर पडून भटकंती करतो म्हणणे हे सत्याला धरून आहे असेच म्हणावे लागेल. पूर्वी असे समजले जावयाचे की माणसाला स्वप्नात दिसते ते सत्य असते का आभास असतो? या सत्याच्या कल्पनेला शास्त्रीय आधार देता येत नाही, म्हणून त्याला भास म्हटले जावयाचे. ही चर्चा ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात सॉक्रेटिस व थिएट्टस

९३