पान:आरोग्याचा शोध (वेध - विकार मुक्तीचे).pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

and Psychiatry). दुसरा म्हणजे मध्य भाग. पातंजल योगसूत्रांत वर्णन केल्याप्रमाणे यातून देहस्वास्थ्य व मनःस्वास्थ्य मिळते व मनाचा जो गाभा, हार्द तो म्हणजे आत्मज्ञान, आत्म्याचे ज्ञान वा आत्मा. याच्या शक्ती काय याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तो अजर, अमर, कालातीत, स्थानातील आहे. हेच वर्णन पाश्चात्य संशोधकांनी व तत्त्ववेत्त्यांनी मनाचे केले आहे. त्यांच्या विचारानुसार मन हे वैश्विक आहे, अतीत आहे. सर्व शक्तिमान आहे. आपण आज भारतीय तत्त्वज्ञान व पाश्चात्य तत्त्वज्ञान व आधुनिक संशोधन या दोन्हीवर नजर टाकून त्यातील साम्ये, विरोध व पूर्णता यांचाच विचार करत आहोत. तूर्त मुख्यतः अर्वाचीन पाश्चात्य विचार आपण जाणून घेऊया.
भक्ती व प्रार्थनेचीक्ती शक्ति :  भक्ती व प्रार्थनेची शक्ती याचा विचार करण्यापूर्वी भक्ती म्हणजे काय, हेच आपण नीट समजावून घेतले पाहिजे. भक्ती म्हणजे प्रेम. निर्व्याज, निरपेक्ष व परमोच्च प्रेम. भक्ती ही इंद्रियशुद्धीकरणाचा मार्ग आहे. आज भौतिक जीवनात जो तो इंद्रियतृप्तीमध्ये रत झालेला दिसतो. म्हणून ती इंद्रिये अशुद्ध म्हणावयाचे. भक्तियोगाच्या अभ्यासाने इंद्रिये शुद्ध होतात. आणि मगच मनुष्य अहंकाररहित, सुख-दुःखाला समान मानणारा असा होतो. सर्वसामान्यपणे आज प्रेम हा शब्द स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधाला लावला जातो. हा विचार कोता आहे. तरुणाला तरुणी आवडली वा तरुणीला तरुण आवडला यात प्रमुख भाग शरीरसुखाचा असतो. या जोड्या लग्न करतात. यथावकाश शरीराची ओढ कमी होऊ लागते. वर उफाळून येतात ते मदभेद तू-तू-मी-मी हा अहंभाव दिसू लागतो, पटेनासे होते किंवा नाइलाज म्हणून एकमेकाला धरून जीवन चालू ठेवले जाते. पण प्रेम म्हणजे त्याग, अपेक्षाविरहित एकमेकांची सेवा व निर्भेळ विश्वास. ही स्थिती सुरू होऊ शकते शारीरिक ओढ किंवा अपेक्षा नष्ट झाल्यावर. अपेक्षा आली म्हणजे अपेक्षाभंगही आलाच. राग, लोभ आले. या सर्वांपासून मुक्त, उच्च स्तराचे प्रेम म्हणजे भक्ती.

  गीतेच्या बाराव्या अध्यायात भक्तियोगाचे अनेकांगी वर्णन आहे. आचार्य विनोबा म्हणावयाचे की भक्तीची शक्ती अफाट आहे. त्या शक्तीला अंत नाही. भक्ती हीसुद्धा योगसाधना आहे. श्रीकृष्णाने योग्यांच्या दोन वर्गांचे वर्णन केले आहे. योग्यांचे दोन

९७