पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश. सह नाववतु ॥ सह नौ भुनक्तु ॥ सह वीर्य करवावहै || तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै || ॐ शांतिः शांति शांतिः ॥ - कठोपनिषत् ॥ " आम्ही उभयतांनी एकत्र रहावें, एकत्र सेवन करावें, एकत्र सामर्थ्य संपादन करावें, आमचें अध्ययन आम्हांला तेजस्वी करणारें असावें, आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो." ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ॥ स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥ -मुण्डकोपनिषत् | हे देवहो, आमचे कान कल्याणप्रद गोष्टी श्रवण करोत. हे यजनीय देवहो, आमचे चक्षु कल्याणकारक गोष्टी पाहोत. स्थिर अशा अवयवांनीं व शरीरांनी युक्त होत्सात्या आह्मांकडून तुमचें स्तवन होवो. देवांनी दिलेलें जें आयुष्य असेल, तें आम्हांस प्राप्त होवो. कालाचें अनाद्यनंतत्व. काल हा अताद्यनंत आहे, हे जसे हिंदूंनी जाणलं, तसे इतर कोणत्याही धर्मातील लोकांनी जाणलें नाहीं. ख्रिस्ती व महंमदी धर्मानुसार पाहतां या जगाचा प्रारंभ होऊन सहा सात हजार वर्षेच झाली. कालाचें अनायनंतत्व आर्यऋषींच्य