पान:आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या पुस्तकांत आर्याच्या बाराही महिन्यांतल्या ठळक ठळक सणांविषयों संपूर्ण विवेचन केलें आहे. कित्येक ठिकाणी हैं विवेचन वाजवीपेक्षाही जास्त पूर्णत्वानें झालें आहे असे कित्येकांस वाटेल. पण अतिविस्ताराचा आक्षेप प्रस्तुत पुस्तकावर करणारांनी आमच्या लोकांतला बहुश्रुतपणाचा अभाव विशेषतः लक्षांत घ्यावा म्हणजे एवढा विस्तार करण्याचा ग्रंथकत्यांचा हेतु निरर्थक नाहीं असे त्यांना दिसून येईल. आमच्या लोकांच्या सामान्य ज्ञानाची मर्यादा अगदीच संकुचित असल्यामुळे व प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश विद्वानांपेक्षां सामान्य जनतेलाच विशे- षतः व्हावा अशी लेखकाची इच्छा असल्यामुळे त्रोटक विवेचन करून गैरसम- जुती वाढविण्यापेक्षां अतिविस्ताराचा दोष पत्करून विषयविवेचन सुगम करणेंच लेखकाला अधिक श्रेयस्कर वाटले असावें, व यांत ते चुकले असले तर त्यांची चूक रास्त बाजूलाच झुकली आहे म्हणून मी तरी त्यांना दोष देण्यास बिलकुल तयार नाहीं.

या पुस्तकाचें नांव " आर्याच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इति- हास" असे देण्यांत ग्रंथकर्त्यानें इतिहासदृष्ट्या एक चूक केली आहे असा आक्षेप येण्याचा संभव आहे. ती चूक म्हणजे ही कीं या पुस्तकांत ज्यांचें विवेचन केले आहे ते सगळेच सण खरोखर आर्यांचे आहेत, की त्यांत अनार्यांच्या उत्सवांची भेसळ झालेली आहे, याची विवेचक दृष्टीनें छाननी न करतां सर्वांना सरसकट आर्याच्या सणांत सन्निविष्ट करण्यांत आले आहे, असें कित्येकांस वाटेल. पण माझ्या मतें हा आक्षेप घेणें जितकें सोपें आहे, तितकेंच ते म्हणतात त्याप्रमाणें छाननी करण्याचें काम बिकट आहे. हल्ह्रींच्या काळांत अस्सल आर्य रक्त कोणाच्या अंगांत किती प्रमाणानें आहे याबद्दलच जेथें विद्वानांत वाद आहे, तेथें निवळ आर्याच्या चालीरीती किंवा सण कोणते होते, हें ठरविणे किती मुष्कि- लीचें आहे? व स्वतःच आपण जर अस्सल आर्य नसलों तर अस्सल आर्याच्या सणांशीं तरी आपणांस काय कर्तव्य आहे? आपणांत जसें संमिश्रित रक्त आहे व तें आपणांस टाकतां येत नाहीं, तसे आपले सणही आर्य व अनार्य यांच्या मिश्रणानें गढूळ झालेले असले तरी आपणास ते आपले म्हणून टाकतां येत नाहींत; म्हणून या संमिश्रित सणांचें विवेचन आहे तसेच केले पाहिजे असा उत्तरपक्ष करतां येण्यासारखा आहे. दुसरी गोष्ट अशी कीं, प्राचीन रोमन लोकांनीं निरनिराळ्या देशांतून वसाहती करतांना तेथील लोकांच्या देवतांना व सणांना आपल्या देवांच्या पंचायतनांत व पंचांगांत प्रविष्ट करून लोकसंग्र-a