या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




वरील परीक्षणात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर कलाकृतीचा साम्रज्याने व साकल्याने

विचार करु लागले असे दिसते. कला निसर्गापासून जन्मल्या हे त्यांना मान्य आहे.

मात्र त्या मागे विशिष्ट हेतूची प्रेरणा होती असे ते मानतात. 'कला म्हणजे एका

दृष्टीने पाहिलेला निसर्ग' येथे कोल्हटकरांचा भिन्न अर्थाने निसर्गाच्या वैचित्र्याकडे

व कलेच्या ऐक्याकडे कल असलेला आपणास दिसून येईल. आपल्या कल्पनागत

हेतूत बिघाड होऊ न देता निसर्गातील हुबे हुब वैचित्र्य जो लेखक आणतो त्याची

कलाकृती श्रेष्ठ असते. ही त्यांची भूमिका आहे.

 कोल्हटकर वाङ्मयीन मूल्यांचा जेव्हां विचार करतात तेव्हां ते गणिती मना-

नेच विचार करतात. ते अंत:करण प्रत्ययावर क्वचितच भिस्त ठेवतांना दिसतात.

त्यांची भिस्त नियमांवर असते. नियम पोटनियमांच्या भाषेतच ते बोलत असतात.

 एकानुसंधत्व (Unities of time, place & action) प्रमाण

शुद्धत्व, वैचित्र्य, नैसगिक नियम - बद्धता याची मूल्यांची यादी ते देतात. श्रीपाद

कृष्ण कोल्हटकर हे अंतिमतः उपयुक्तता वादीच टीकाकार आहेत. म्हणून त्यांच्या

कलाविचारात साध्य-साधन भाव आल्याशिवाय रहात नाही. त्यांच्या दृष्टीने

ललित कलाकृतीची सिद्धी उलट आनदप्राप्ती असून कोणत्याही हेतूच्या सिद्धार्थ

'चार प्रकारची कारणे लागतात. १) उपादान कारण २) करण ३) कल्पकता व

योजकता ४) प्रयोजन. या संदर्भात घराचे उदाहरण घेतले तर मृत्तिका हे उपा-

दान कारण, हत्यार म्हणजे ज्या आधारे वस्तु बनविल्या जातात ते करण, ज्या

विचाराने वस्तू निर्माण होते म्हणजे घट वनविण्यास कुंभार का प्रवृत्त झाला (असे

है वेगळा अर्थ असलेले) ती कल्पकता किंवा योजकता आणि एका विशिष्ट वस्तूचा

एका विशिष्ट दृष्टीने वापर करणे म्हणजे प्रयोजन. अशी ही कलेची चतु:सुनी

कोल्हटकरांनी मांडली आहे.

 कोल्हटकर कलाकृतीचे विश्लेषण कलाकृती नसलेल्या बाह्य जनातील वस्तू

तर्कशास्त्राप्रमाणे घडणाऱ्या घटने सारखेच करतात. त्यांचे हे विश्लेषण म्हणजे

कोल्हटकरांच्या गणिती मनाच्या कार्यपद्धतीचे आदर्श प्रात्यक्षिकच आहे. हे विधान

मान्य करावे लागते. पण त्यामुळे त्यांच्या विचाराची दिशा फार मोठ्या प्रमाणांत

चुकली असे मानावे लागते.

 कोणत्याही वस्तूचे प्रथम प्रयोजन निश्चित करणे, ते साध्य करण्यासाठी

कार्यभूत घटक तपासणे ही कोल्हटकरांची खास पद्धती आहे. त्यामुळे कलाकृतीला

एक प्रकारचे सोपेपण प्राप्त झाल्याचे दिसून येते. वस्तुतः साहित्य कृतीच्या मागे

असे एकेरी स्पष्ट व निश्चित प्रयोजन असत नाही. कोल्हटकर कलाकृतीचे सर्वां-

गीण रुप, प्रयोजन ठरवितांना लक्षात घेत नाहीत. त्यांची ही निश्लेषण पद्धती

वाङ्मयाला नीटपणे लावता येत नाही
२६        आलेख