या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





तात. आणि हे भावविश्व साकार होत असतांना निसर्गाच्या किती तरी विविध व

अनन्य साधारण प्रतिमा त्यांच्या काव्यात येऊन जातात. ही कविता वाचकांच्या

मनाला अक्षरश: भूरळ पाडणारी, पुन्हा पुन्हा वाचीत रहावी अशी वाटते याचे

कारण हेच आहे. उत्कट भाव आणि समर्थ प्रतिमा यातून ती उमलते. शब्दा-

शब्दांवर कवयित्रीच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटलेला दिसतो. त्यांची या शब्दांची ची,

कल्पनांची निवड मोठी कलात्मक, सूचक, भावकोवळी आणि चपखल असते.

प्रतिमांची पुनरावर्तने सुद्धा अवीट गोडी आणि भाव मधुरता व्यक्त करणारी

झालेली आहेत. त्यांच्या रंगबावरी प्रमाणेच 'बाहुल्या' मध्ये सुद्धा या अप्रतिम,

मनोहर, भावानुकूल शब्द योजनेचा, अभिव्यक्ती पद्धतीचा प्रत्यय येतो. मोठे परि

.णामकारक, संवेदक असे हे शब्द विश्व आहे. मोजक्या आणि नेटक्या शब्दात

किती तरी शब्दचित्रे त्यांनी आपल्या 'बाहुल्या' संग्रहात रेखाटली आहेत. 'गंधाली',

'बाहुल्या' या कविता तर प्रतिक योजनांच्या दृष्टीने विशेष लक्षणीय व सर्वांगसुंदर

मानाव्या लागतील.

 'बाहुल्या'च्या भाषेचा विचार करीत असतांना स्पष्ट जाणीव होते ती इंदिरा

संतांच्या वर्णन शैलीची. कितीतरी कवितांमध्ये ही व्यक्तींची शब्दचित्रे-परिस्थिती

चित्रे उत्कटत्वाने साकार झालेली आहेत.कधी कधी अनुभवाच्या

उत्कटनेपेक्षा वर्णमालाच जास्त महत्त्वही या काव्य संग्रहात दिल्याचे दिसून

येईल. 'वास्तू' (पृ. ८) 'तुळशी वृंदावन' (पृ. १०) 'आज माळ बेचैन आहे'

(पृ. १७) बंदिस्त (पृ. २३), त्याचा संसार (पृ. ६५), पेपर (पू. ७५), 'तोरात्र'

(पृ. ४४) 'ही अशी तर ती तशी' (पृ. ३) 'दीपदान' (पृ. ७२) जेव्हा कधी

स्वप्न पडते' (पृ. ८३) इत्यादी कितीतरी कविता अनेक दृष्टीने वर्णन-चित्रणे

शब्द करताना म्हणून विचारात घेता येतील.

 'ती रात्र' या कवितेतील वर्णन आपले लक्ष वेधून घेते. रुग्णालयातील ही

लक्षणीय रात्र आहे.

  'आत चाललेली परिचारिकांची धावपळ

  डॉक्टरांचा दबलेला जड आवाज

  उपकरणांचा आवाज. बर्फ फोडल्याचा आवाज

  हलणाऱ्या सावल्यांचा आवाज

  आतून हे सारे येत असते.'

 मुळातूनच पहावी अशी ही वर्णने साक्षात चित्रे डोळयापुढे उभी करतात.

भेदरलेल्या मुलाचे चित्र जेन्हा कधी स्वप्न पडतात 'मधील पहाण्यासारखे आहे.

  'डगमगत्या शिडीच्या अगदी वरच्या पायरीवरून

  घट्ट दांडे धरून खाली बघणारे ते

  भेदरलेले मूल - किंवा

आलेख          ४९